आमदारांची लॉटरी; मिळाले 166 कोटींचे हे गिफ्ट!

आमदारांची लॉटरी; मिळाले 166 कोटींचे हे गिफ्ट!

सरकारने जनतेला एखादी भेट देण्याऐवजी सर्व आमदारांना एक मोठी भेट दिली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 23 जानेवारी: तेलंगणा राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत के.चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने मोठा विजय मिळवला. राज्यातील नव्या सरकारने जनतेला एखादी भेट देण्याऐवजी सर्व आमदारांना एक मोठी भेट दिली आहे. या भेटीची किमत 166 कोटी इतकी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की कोट्यावधी रुपये खर्च करून सरकारने आमदारांना अशी कोणती भेट दिली आहे.

राज्य सरकारने प्रत्येक आमदारासाठी 120 इमारती बांधल्या आहेत. या इमारती बांधण्याचा खर्च तब्बल 166 कोटी इतका आला आहे. केवळ आमदारच नव्हे तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी देखील 12 मजल्यांच्या 45 इमारती बांधण्यात आल्या आहेत. आमदारांसाठी शहरातील हैदरगुडा परिसरात घरे बांधण्यात आली आहेत. तसेच विधानसभेच्या कर्मचाऱ्यांसाठी 4.5 एकर परिसरात इमारत बांधण्यात आल्या आहेत . टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानाबरोबरच अन्य व्यवसाईक कॉम्प्लेक्स देखील तयार करण्यात आले आहेत. जेथे आमदार व अन्य कर्मचाऱ्यांना इतर सुविधा मिळतील.

आमदारांसाठी तयार करण्यात आलेल्या या इमारतीमध्ये भेटण्यात आलेल्या व्यक्तींना बसण्यासाठी स्वतंत्र जागा करण्यात आली आहे. त्याशिवाय ऑफिस, ड्रॉईंग रुम, किचन, मास्टर बेडरुम आणि अन्य रुम्स करण्यात आल्या आहेत. जर विधानसभा आमदाराने जुने निवासस्थान सोडले नाही. तर नव्याने बांधण्यात आलेले निवासस्थान विधान परिषदेच्या सदस्यांना दिले जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव लवकरच याचे उद्घाटन करणार आहेत.

VIDEO : बास्केटबॉलच्या मॅचमध्ये WWE, तरुणींमध्ये तुफान हाणामारी

First published: January 23, 2019, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading