Home /News /national /

हे राम! मंत्र्यांनीच लॉकडाउनचं केलं उल्लंघन, रामनवमीच्या सोहळ्याला पोहोचले मंदिरात

हे राम! मंत्र्यांनीच लॉकडाउनचं केलं उल्लंघन, रामनवमीच्या सोहळ्याला पोहोचले मंदिरात

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू केलेलं असतानाही 2 मंत्री रामनवमीच्या सोहळ्याला हजर राहिले. धक्कादायक म्हणजे त्याठिकाणी शेकडो लोक उपस्थित होते.

    हैदराबाद, 02 एप्रिल : एकीकडे कोरोनामुळे लॉकडाउन आणि व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला असतानाही लोकांना याचं गांभीर्य नसल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नका. गर्दी कऱणं टाळा अशा अनेक सुचना वारंवार दिल्यानंतरही अशा अनेक घटना घडत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतरही अनेक शहरांमध्ये सर्वसामन्यांसह नेतेमंडळीसुद्धा याला जुमानत नसल्याचं दिसून आलं आहे. आता तेलंगणाचे 2 मंत्री लॉकडाउन असतानाही रामनवमीच्या समारंभात पोहोचले. तेलंगणाच्या या मंत्री महोदयांनी त्यांच्या पत्नीसह रामनवमीच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. दोघेही तेलंगणाच्या प्रसिद्ध सीताराम चंद्र स्वामी मंदिरात गेले होते. मंत्र्यांचा या ठिकाणी गेलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लॉकडाउनच्या काळात त्यांना असं बाहेर फिरताना पाहून लोकांनी टीका केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे रामनवमीच्या या सोहळ्याला शेक़डो लोक पोहोचले होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री सातत्याने लॉकडाउनच्या काळात लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. तरीही त्यांच्याच मंत्र्यांनी रामनवमीला हजेरी लावली. हे वाचा : सावध राहा! कोरोनाला रोखण्यासाठी PM मोदींनी केल्या या 11 सूचना कोरोनामुळे तेलंगणात मृतांची संख्या 6 झाली असल्याची माहिती तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे. त्या माहितीनुसार हे सर्व लोक 13 ते 15 मार्च या काळात दिल्लीतील निजामुद्दीन भागातील मरकज मध्ये तब्लीगी जमातमध्ये सहभागी झाले होते. हे वाचा : रुग्णालयातून पळून घरी गेला कोरोना रुग्ण; पत्नी, मुलींसह 12 लोकांना झाली लागण
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या