S M L

पेट्रोल दराच्या कपातीतून वाचवले 9 पैसे, पंतप्रधानांना पाठवला चेक

सरकारने इंधनांच्या किंमतीत केलेल्या ९ पैशांच्या कपातीमुळे मी ते पैसे वाचवले आहेत, म्हणून मी हे पैसे पंतप्रधान सहाय्य निधीत दान म्हणून देण्याचा निर्णय घेतला

Sachin Salve | Updated On: Jun 5, 2018 07:54 PM IST

पेट्रोल दराच्या कपातीतून वाचवले 9 पैसे, पंतप्रधानांना पाठवला चेक

तेलंगणा, ५ जून :  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत होत असणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता पुरती वैतागली आहे. तेलंगणामध्ये इंधन दरवाढीमुळे वैतागलेल्या के.वी.चंद्रैय्या यांनी पंतप्रधान मोदींना चक्क नऊ पैशांचा चेक पाठवलाय.

तेलंगणा मधील सिरसिला जिल्ह्यातील रहिवाशी के. वी. चंद्रैय्या या इसमाने इंधनाच्या दरवाढीचा विरोध दर्शवत पंतप्रधान राहत फंडात चक्क 9 पैशांचा चेक दान म्हणून दिलाय. प्रजा वाणी या कार्यक्रमा दरम्यान आपल्या येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे हा चेक देऊ केला आहे.

"सरकारने इंधनांच्या किंमतीत केलेल्या ९ पैशांच्या कपातीमुळे मी ते पैसे वाचवले आहेत, म्हणून मी हे पैसे पंतप्रधान सहाय्य निधीत दान म्हणून देण्याचा निर्णय घेतला आणि मला आशा आहे की या पैशांचा चांगल्या कामासाठी वापर होईल", अशी अपेक्षा चंद्रैय्यांनी व्यक्त केली.

मागील आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये १३ आणि ९ पैशांनी घट झाली होती. याअगोदरही सात दिवसांपर्यंत इंधनाच्या दरात घट झाली होती. त्याचबरोबर कर्नाटक निवडणुकीदरम्यान १६ पैशांपर्यंत इंधनांच्या किंमतीत वाढ झाली होती.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं की, सरकार यावर दीर्घकालीन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.

Loading...
Loading...

आंध्रप्रदेशातील रायसीमा भागातील एका शेतकऱ्याने अशाच काही तणावाखाली पंतप्रधांना  त्यांच्या वाढदिवशी ०.६८ पैशांचा चेक भेट दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2018 07:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close