News18 Lokmat

तिच्या देखत पतीची भररस्त्यावर कोयत्याने वार करून हत्या

त्यांची चुकी एवढीच होती की त्यांनी प्रेम केलं...

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2018 01:53 AM IST

तिच्या देखत पतीची भररस्त्यावर कोयत्याने वार करून हत्या

महेश तिवारी, तेलंगाणा, 14 सप्टेंबर : दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम, पण मुलीकडून घरच्यांचा विरोधात...अखेर घरच्यांचा विरोध डावलून दोघेही पळून जावून आपला संसार थाटतात...पण त्यांच्या या संसाराला त्यांच्याच जन्मदात्यांची नजर लागते. आपल्या मुलीने दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत लग्न केलं याचा राग धरून मुलीसमोरच तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केला जातो...सैराट सिनेमात घडवा असा हा अंगावर काटा आणणारा प्रसंग तेलंगाणामध्ये घडलाय. त्यांची चुकी एवढीच होती की त्यांनी प्रेम केलं...

तेलंगणाच्या नलगोंडा जिल्हयातल्या मिर्यालगुडा इथं आज दिवसाढवळया एका प्रेम विवाहीत जोडपं जात असतांना पतीची पत्नीसमोर धारदार कोयत्याने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालीये. हा संपुर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध असल्याने मुलीच्या वडिलासह काकाला या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा आरोपी बनवलंय.

मिरयालगुडा येथील मारोतीराव या नामांकीत बिल्डराची मुलगी अमृत वर्षीणी आणि तिचा शाळकरी मिञ प्रणयने आठ महिन्यापूर्वी घरच्याचा विरोध पत्कारुन आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या वडिलाकडून या जोडप्याला अनेकदा धमक्याही मिळाल्या होत्या. पण तरीही त्यांनी कुणाची तमा बाळगली नाही.

घरदार सोडून दोघांचा तेलंगाणाच्या मिर्यालगुडा भागात दोघे गुण्यागोविंदाने राहत होते. त्यांच्या या दोघांच्या संसारात तिसरा पाहुणाही येणार आहे. नव्या पाहुण्याचे स्वप्न पाहुन दोघेही आनंदी होती.

Loading...

आज सकाळी पाच महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नी अमृताला घेऊन स्थानिक रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रणयवर अज्ञात इसमाने मागून येऊन कोयत्याने वार केल्या. हा हल्ला इतका भीषण होता की, प्रणय जागीच कोसळला. पतीवर झालेल्या हत्येने अमृताही जागेवर बेशुद्ध झाली.

हल्ला करणारा हल्लेखोर तेथून पळून गेला. स्थानिकांनी धावाधाव करून पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. अमृताच्या फिर्यादीवरून

पोलिसांनी अमृताच्या वडील आणि काकांवर हत्येचा गुन्हा दाखल केलाय. आपल्या मुलींचा संसार उद्धवस्त करणारे हे दोघेही फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

============================================

Viral Video : बेफाम नाचणाऱ्या या स्कूलगर्लच्या व्हिडिओतली ही मुलगी कोण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 08:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...