हा रोहित शेट्टीचा सिनेमा नाही तर रिअल आहे, पुरात वाहून जाणाऱ्या गाड्यांचा ढीग; पाहा VIDEO

हा रोहित शेट्टीचा सिनेमा नाही तर रिअल आहे, पुरात वाहून जाणाऱ्या गाड्यांचा ढीग; पाहा VIDEO

रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये किंवा बऱ्याचदा हॉलेवूडमध्ये गाड्या एकमेकांवर चढवून थरारक स्टंट केले जात असल्याचं पाहिलं आहे.

  • Share this:

हैदराबाद, 14 ऑक्टोबर : रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये किंवा बऱ्याचदा हॉलेवूडमध्ये गाड्या एकमेकांवर चढवून थरारक स्टंट केले जात असल्याचं पाहिलं आहे. पण विना ड्रायव्हरच्या गाड्या प्रत्यक्षात एकमेकांवर चढल्याचं आणि मुसळधार पावसातला थरारक स्टंट प्रत्यक्षात घडल्याचं हैदराबादमध्ये पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे हैदराबादच्या रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे तर पाण्याचा प्रवाह आणि वेग खूप जास्त असल्यामुळे रस्त्यावरच्या गाड्या विना ड्रायव्हर या प्रवाहासोबत वाहून जात असल्याचं पाहायला मिळालं.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक कार वाहून दुसऱ्या कारवर गेली. या दोन्ही कार एकमेकांवर चढल्या आहेत. तिसरी कार वाहून येत असतानाच ती या समोरच्या कारला धडकते आणि त्या गाडीवर आपटल्यानं मधली लाल कार आधीच्या कारच्या टपावर ढकलली जाते. तीन गाड्या या पाण्याच्या प्रवाहत वाहून येत एकमेकांवर चढल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचा-'होतं नव्हतं सगळं पावसानं नेलं'; हे PHOTOS पाहून डोळ्यात येतील अश्रू

गेल्या तीन दिवसांपासून हैदराबाद आणि तेलंगणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचं धुमशान सुरू आहे. त्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मान्सूनचा प्रवास लांबला आणि ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसानं धुमशान घातलं. NDRF च्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे. अनेक भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. भीषण पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे दोन दिवस प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि सरकार NDRF च्या टीमला मदत करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 14, 2020, 2:11 PM IST
Tags: telangana

ताज्या बातम्या