S M L

आयपीएस महेश भागवत यांचा अमेरिकेतर्फे गौरव

तेलंगणातील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेनं मानवी तस्करीविरोधात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jul 1, 2017 02:49 PM IST

आयपीएस महेश भागवत यांचा अमेरिकेतर्फे गौरव

1 जुलै : तेलंगणातील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेनं मानवी तस्करीविरोधात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अमेरिकेने त्यांचा नुकताच ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड देऊन गौरव केला आहे.  महेश भागवत सध्या हैदराबादमधील राचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. ते मुळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीचे आहेत

महेश भागवत हे गेल्या 13 वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या तेरा वर्षांमध्ये त्यांच्या पथकाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणात शेकडो बालमजुरांची सुटका केली. शिवाय तेथील देहविक्री व्यवसायदेखील बंद केलेत. तेलंगणामधील मानवी तस्करीसोबत संबंध आलेल्या पुणे, बंगळुरू, दिल्ली तसंच सिंगापूर येथील केंद्रावरही महेश भागवत आणि त्यांच्या पथकानं कारवाई केली आहे. धडक कारवाईसोबतच भागवत यांनी मानवी तस्करीविरोधात मोठ्या प्रमाणावर जन जगजागृतीही केलीय. पीडितांचे पुनर्वसनही केलंय. आंध्र प्रदेश, तेलंगणातील नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्यातही महेश भागवत यांचं मोठं योगदान आहे.

महेश भागवत यांनी आतापर्यंत ३५० वीटभट्टी बालकामगारांचीही सुटका केलीय. तेलंगणा राज्यात त्यांनी स्वयंसेवी संस्थाना सोबत घेऊन मानवी तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवली आहे त्याचीच दखल म्हणून अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने भागवत यांचा विशेष गौरव केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2017 02:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close