तेलंगाना, 8 ऑक्टोबर : हैदराबादच्या एका चिमुरड्याने वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये World Book of Record आपल्या नावाची नोंद केली आहे. हा चिमुरडा केवळ एक वर्ष नऊ महिन्यांचा आहे. हैदराबादच्या या आदिथ विश्वनाथ गौरीशेट्टीने Aadith Vishwanath Gourishetty त्याच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेने, शार्प मेमरीने sharp memory सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. आदिथ विविध देशाचे झेंडे, कार-कारचे लोगो, अल्फाबेट्स, फळं, भाजीपाला अगदी काही क्षणात ओळखतो.
घरातील इलेक्ट्रोनिक वस्तू, व्यवसाय, प्राणी यासह इतर अनेक गोष्टी, त्यांची नावं, अनेक वस्तूंची ओळख सांगतो. गोष्टी, वस्तू लक्षात ठेवण्याच्या आदिथच्या या स्मरणशक्तीसाठी, त्याच्या या जबरदस्त बुद्धीमत्तेसाठी वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.
आदिथ अनेक कोडी अगदी सहजतेने अशी काही सोडवतो की, पाहणारा प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. आदिथच्या या स्मरणशक्ती, शार्प बुद्धीमत्तेमुळे त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तेलगू बुक ऑफ रेकॉर्ड, सर्टिफिकेट्स ऑफ नॅशनल रेकॉर्ड्स त्याच्या नावे आहेत. सावल्यांवरुन वाहनं ओळखणं, अतिशय जटिल रंग-संगती, रंग नमुने, प्राण्यांचे आवाज, पक्षी, शरीराचे अवयव अशाप्रकारच्या अनेक गोष्टी आदिथ चुटकीसरशी ओळखतो.
Telangana: One year & 9 months old Aadith Vishwanath Gourishetty of Hyderabad makes it to World Book of Record & four other record books for having a sharp memory. His father says, "He can recognise alphabets, pictorial objects, logos, flags, fruits, animals etc." (07.10.2020) pic.twitter.com/Lg4ozq9UWd
— ANI (@ANI) October 7, 2020
आदिथचे आई-वडील अरुण साई आणि स्नेहिता यांनी सांगितलं की, आदिथने आतापर्यंत 17 कॅटेगरीमधील 272 चित्र ओळखली असून त्याला 'Super Kid' आणि 'The Mnemonist Wonder Kid' ही उपाधी देण्यात आली आहे. खासदार वीरेंद्र शर्मा आणि वर्ड बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष संतोष शुक्ला यांनीही या चिमुकल्या आदिथचं कौतुक केलं आहे.