मराठी बातम्या /बातम्या /देश /हजारो फूट उंचीवर तेलंगाणाच्या राज्यपाल आल्या देवासारख्या धावून! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

हजारो फूट उंचीवर तेलंगाणाच्या राज्यपाल आल्या देवासारख्या धावून! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्लीवरून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) विमानात अचानाक एका प्रवाशाला त्रास जाणवू लागला. अशात तेलंगाणाच्या राज्यपाल डॉ. तमिळीसाई यांनी तातडीने रुग्णावर (Medica Emergency in Flight) प्रथमोपचार केले.

नवी दिल्लीवरून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) विमानात अचानाक एका प्रवाशाला त्रास जाणवू लागला. अशात तेलंगाणाच्या राज्यपाल डॉ. तमिळीसाई यांनी तातडीने रुग्णावर (Medica Emergency in Flight) प्रथमोपचार केले.

नवी दिल्लीवरून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) विमानात अचानाक एका प्रवाशाला त्रास जाणवू लागला. अशात तेलंगाणाच्या राज्यपाल डॉ. तमिळीसाई यांनी तातडीने रुग्णावर (Medica Emergency in Flight) प्रथमोपचार केले.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Telangana, India

    हैदराबाद, 23 जुलै : डॉक्टर झालेला मनुष्य नंतर अन्य कोणत्याही क्षेत्रात गेला किंवा तो कुठेही असला, तरी त्याला आपला पेशा निभावण्याची वेळ कधीही येऊ शकते. केवळ दवाखान किंवा हॉस्पिटलमध्येच तो डॉक्टर असतो असं काही नाही. अचानक कोणाची तब्येत बिघडली, तर त्यांना मरणाच्या दारातून बाहेर काढण्याचं काम डॉक्टरच करतात. त्यामुळेच त्यांना देवाचं रूप मानलं जातं. हे खरं करणारा प्रसंग (Telangana Governor) तेलंगाणाच्या राज्यपाल डॉ. तमिळीसाई सौंदरराजन (Dr. Tamilisai Soundararajan) यांच्या बाबतीत नुकताच घडला. 'सियासत डॉट कॉम'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    शनिवारी (23 जुलै) नवी दिल्लीवरून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) विमानातून त्या प्रवास करत होत्या. तेवढ्यात त्या विमानाच्या एअर होस्टेसने घोषणा केली, की विमानात कोणी डॉक्टर असेल, तर त्यांची आत्ता गरज आहे. डॉ. तमिळीसाई तातडीने रुग्णाला (Medical Emergency in Flight) पाहायला धावल्या. एका प्रवाशाला चक्कर येत होती. त्याला खूप घाम आला होता. त्याला अपचन झालं असावं, अशी लक्षणं दिसत होती. त्यांनी त्या प्रवाशाला आडवं झोपवलं. त्याची प्राथमिक तपासणी केली आणि त्याच्यावर प्रथमोपचारही केले. काही औषधंही त्याला देण्यात आली. मुख्य म्हणजे त्याला काहीही होणार नाही, त्याने काळजी करू नये, असा विश्वासही त्यांनी त्या प्रवासी रुग्णाला दिला.

    डॉ. तमिळीसाई सौंदरराजन यांनी स्वतःच ट्विट करून या प्रसंगाबद्दलची माहिती दिली. 'प्रकृती बिघडलेल्या त्या प्रवाशाच्या तोंडावर, तसंच अन्य सहप्रवाशांच्या तोंडावर उपचारांनंतर हसू खुललेलं पाहिल्याने बरं वाटलं,' असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

    विमान हैदराबादला आल्यानंतर त्या प्रवाशाला व्हीलचेअरवर बसवून विमानतळावरच्या मेडिकल बूथमध्ये नेण्यात आलं. तिथे त्याची तपासणी करून पुढचे उपचार करण्यात आले.

    कोरोनासोबत भारतात आता मंकीपॉक्सही पसरतो हातपाय; आणखी एक रुग्ण सापडल्याने खळबळ

    वेळेत घोषणा केल्याबद्दल आणि आवश्यक ते साह्य केल्याबद्दल डॉ. तमिळीसाई यांनी इंडिगोच्या एअर होस्टेसचे आभार मानले आणि कौतुकही केलं. तसंच, त्यांनी कंपनीला काही सूचनाही केल्या.

    'विमानातलं फर्स्ट एड किट केव्हाही वापरता येण्यायोग्य स्थितीत हवं. त्यातले घटक रोजच्या रोज तपासले जायला हवेत. तसंच विमानातून प्रवास करणाऱ्यांपैकी कोणी डॉक्टर असेल, तर ट्रॅव्हल चार्ट्समध्ये त्यांच्या नावापुढे तशी नोंद करायला हवी. म्हणजे इमर्जन्सीच्या वेळी त्याचा उपयोग होईल. रेल्वेत अशा प्रकारे ट्रॅव्हल चार्टवर डॉक्टर्सची नोंद असते,' असं राज्यपाल डॉ. तमिळीसाई यांनी सांगितलं.

    तसंच, 'कार्डिओ पल्मोनरी रिसस्किटेशन स्किलचं (Cardio Pulmonary Resuscitation - CPR) प्रशिक्षण क्रू-मेंबर्सना दिलं पाहिजे, जेणेकरून अचानक कोणी आजारी पडल्यास त्याचा उपयोग होऊ शकेल,' असंही त्यांनी सुचवलं. तसंच, CPR चं ट्रेनिंग नागरिकांनीही करून घ्यावं, जेणेकरून कुठेही त्याचा उपयोग होऊ शकतो, असंही त्या म्हणाल्या.

    एमबीबीएस झाल्यानंतर डॉ. तमिळीसाई सौंदरराजन यांनी स्त्रीरोगशास्त्र (Gynecology) या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर त्या डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायच्या. नंतरच्या काळात त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. 2019पासून त्या तेलंगण राज्याच्या राज्यपाल आहेत.

    First published:

    Tags: Medical, Telangana