नोकरीच्या आमिषानं 50 भारतीयांची एजंटकडून फसवणूक; रवानगी इराकच्या जेलमध्ये?

नोकरीच्या आमिषानं 50 भारतीयांची एजंटकडून फसवणूक; रवानगी इराकच्या जेलमध्ये?

नोकरीच्या आमिषानं 50 भारतीय तरूणांची फसवणूक झाली असून त्यांची रवानगी आता इराकच्या जेलमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:

हैद्राबाद, 07 जुलै : नोकरीच्या शोधात अनेक भारतीय परदेशात जातात. अनेक वेळा त्यांची फसवणूक देखील होते. त्यानंतर त्यांची सुटका करण्यासाठी भारतीय दूतावासाची मदत घेतली जाते. 2014मध्ये 39 भारतीयांचा सीरियामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नोकरीच्या शोधात गेलेले 50 भारतीय इराकमध्ये फसले आहेत. 50 तरूण हे तेलंगनामधील मंचेरियन येथील आहेत. या 50 तरूणांसोबत एजंटनं धोका केला आहे. त्यांना इराकमधील इरबिल येथे ठेवण्यात आलं असून त्यांच्याकडे जबरदस्तीनं काम करून घेतलं जात आहे. तेलंगनातील या तरूणांना नोकरीचं आमिष दाखवत व्हिजिटर व्हिसावरती इराकमध्ये नेण्यात आलं. त्यांना त्यावेळी चांगली नोकरी देण्याचं आमिष दाखवलं गेलं. पण, तिथं पोहोचल्यानंतर मात्र त्यांची फसवणूक झाल्याचं त्यांना कळलं. सध्या हे 50 तरूण जबदस्तीनं एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम करत आहेत.

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशात देखील सरकार धोक्यात?

तरूण इराकच्या तुरूंगात?

दरम्यान, फसलेल्या भारतीय तरूणांना आता पोलिसांनी अटक केली असून त्यांना तुरूंगात टाकण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. याबद्दल नातेवाईकांना देखील कोणतीही अधिक माहिती मिळत नाही आहे. त्यांना नोकरी देण्याच्या आमिषानं इराकला नेण्यात आलं आणि त्यांची फसवणूक झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. इराकमध्य़े नेताना तरूणांना 50 हजार रूपये पगार देण्याचं वचन एजंटनं दिलं होतं. पण, इराकमध्ये पोहोचल्यानंतर मात्र त्याचं व्हिसा काढून घेण्यात आला. शिवाय, त्यांना कमी पगार देत राबवून घेत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

राफेल विमानांना कबुतरांपासून धोका; IAFनं व्यक्त केली चिंता

भारतीय दूतावास करणार मदत?

परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांची सुटका ही भारतीय दूतावासाच्या मदतीनं करण्यात आली आहे. त्यामुळे इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी दूतावास काय प्रयत्न करणार का? याकडे देखील नातेवाईकांचे डोळे लागून राहिले आहेत.

VIDEO: ...जेव्हा खासदार नवनीत राणा थेट शेतात जाऊन हाती नांगर घेतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Iraqjob
First Published: Jul 7, 2019 02:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading