हैदराबाद, 27 जानेवारी: शेतकरी बसावैया वय वर्ष 75 आणि त्यांची पत्नी लक्ष्मी सध्या भीक मागत आहेत. अर्थात तुम्हाला वाटत असेल बसावैया आणि त्यांची पत्नी जगण्यासाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागत आहेत, तर थांबा. बसावैया चक्क सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी भीक मागत आहेत.
तेलंगणामधील जयशंकर भूपलपल्ली जिल्ह्यातील शेतकरी असलेले बसावैया यांना त्यांच्या जमीनीसाठी पासबुक पाहिजे होते. त्यासाठी ते तहसीलदार के. सत्यानारायण यांची भेट घेतली. मात्र पासबुक देण्यासाठी तहसीलदारांनी त्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली.
तहसील कार्यालयात वारंवार जाऊन देखील पासबुक न मिळाल्याने अखेर लाच देण्यासाठी बसावैया यांनी भीक मागण्यास सुरुवात केली. बसावैया यांनी आरोप केला की, संबंधित अधिकारी त्याच्या जमिनीवर अन्य काही लोकांची नावे जोडणार होता. या घटनेची माहिती जेव्हा जिल्हाधिकारी वसम वेंकटेश्वरलू यांना समजली. तेव्हा त्यांनी बसावैया आणि त्यांच्या पत्नीला कार्यालयात बोलवून घेतले आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पासबुक दिले.
लाच मागितली नाही
दरम्यान एका अधिकाऱ्याने दावा केला की, संबंधित शेतकऱ्याकडून कोणत्याही प्रकारची लाच मागण्यात आली नव्हती. त्याच्या जमिनीचा एक भाग वादात होता. त्याची चौकशी सुरु आहे.
VIDEO: बायकोला प्रियकरासोबत रंगे हात पकडलं, पतीने भर रस्त्यात घातला राडा