मराठी बातम्या /बातम्या /देश /ईव्ही स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन 80 वर्षांच्या ज्येष्ठाचा मृत्यू, तेलंगणातील घटना

ईव्ही स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन 80 वर्षांच्या ज्येष्ठाचा मृत्यू, तेलंगणातील घटना

death

death

सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक ग्राहक पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींऐवजी ईव्ही स्कूटरला पसंती देत आहेत. ईव्ही स्कूटर पर्यावरणपूरक आणि आपला इंधन खर्च कमी करणाऱ्या असल्या तरी त्यातून काही अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत. तेलंगणातील (Telangana) निजामाबाद (Nizamabad) जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 21 एप्रिल: बदल ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे, असं म्हटलं जातं. काळाच्या ओघात आणि परिस्थितीची गरज लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रात बदल होतात. ऑटोमोबाईल क्षेत्रातही (Automobile Industry) सध्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. वाहनांसाठी लागणारं इंधन हे या बदलांमधील सर्वात मोठं कारण आहे. गेल्या कित्येक शतकांपासून आपण मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनावर (Fossil Fuels) विसंबून आहोत. जीवाश्मांपासून तयार होणाऱ्या पेट्रोल किंवा डिझेलवर (Petrol and diesel) चालणाऱ्या वाहनांमुळे होणारं कार्बन उत्सर्जन (Carbon Emissions) पाहता, त्याला पर्याय शोधणं आवश्यक झालं. अशा वेळी इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicles) पर्याय समोर आला आहे.

    सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक ग्राहक पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींऐवजी ईव्ही स्कूटरला पसंती देत आहेत. ईव्ही स्कूटर पर्यावरणपूरक आणि आपला इंधन खर्च कमी करणाऱ्या असल्या तरी त्यातून काही अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत. तेलंगणातील (Telangana) निजामाबाद (Nizamabad) जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. घरामध्ये चार्जिंग सुरू असलेल्या एका इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooter) बॅटरीचा स्फोट (Battery Explosion) झाल्यानं 80 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. बी. रामस्वामी (B Ramaswamy) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याव्यतिरिक्त कुटुंबातील चार सदस्य भाजल्यामुळे जखमी झाले आहेत.

    Omicron XE Variant Symptoms: Omicron XE व्हेरिएंटमुळे भारतावर Corona च्या चौथ्या लाटेचं सावट?, लहान मुलांना सर्वाधिक धोका

    थ्री टाऊन पोलीस स्टेशनचे (Three Town Police Station) उपनिरीक्षक साई नाथ यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार, पीडित बी. रामास्वामी यांचा टेलर मुलगा बी. प्रकाश एका वर्षापासून ईव्ही स्कूटर वापरत होता. बुधवारी मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास प्रकाशनं स्कूटरची बॅटरी काढून नेहमीप्रमाणे चार्जिंगसाठी ठेवली होती. त्यावेळी प्रकाशचे वडील रामास्वामी, आई कमलम्मा आणि मुलगा कल्याण लिव्हिंगरुममध्ये (Living Room) झोपलेले होते. पहाटे 4 वाजताच्या सुमारास चार्जिंगला लावलेल्या ईव्ही बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात लिव्हिंगरुममध्ये झोपलेले तीन सदस्य आणि त्यांच्या मदतीसाठी आलेले प्रकाश व त्यांची पत्नी कृष्णवेणी असे एकूण पाचजण जखमी झाले होते. यापैकी गंभीर जखमी झालेल्या रामास्वामी यांना हैदरबाद येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर इतर जखमींवर एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

    निजामाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) ए. व्यंकटेश्वरलू (A Venkateswarlu) यांनी इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी स्कुटर निर्मिती करणाऱ्या हैदराबादस्थित स्टार्टअप आणि डिलरविरुद्ध आयपीसी कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान, निजामाबादमधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून, इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपकडून अद्याप याबाबत काहीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

    First published:

    Tags: Accident, Death, Electric vehicles, Telangana