हैदराबाद, 19 एप्रिल : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात केंद्र सरकारने सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केलं होतं. त्यानंतर पुन्हा 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं. दरम्यान, महाराष्ट्राच्या शेजराचं राज्य तेलंगणाने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा राज्य सरकारने 7 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे.
लॉकडाऊनच्या निर्णयाबद्दल केसीआर सरकारने सांगितलं की, आम्ही तेलंगणामध्ये 7 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे. 8 मे रोजी लॉकडाऊन संपेल. राज्यात परदेशातून परतलेले फकत 64 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिल्लीतून परतलेल्या निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्या जमातींची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासत आहे. तेलंगणा राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्यणानंतर सांगितलं की, आम्ही हे ठरवलं आहे की तेलंगणामध्ये याची कडक अंमलबजावणी होईल.
राज्यात ऑनलाइन फूड सर्व्हिस देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे फूड सर्व्हिस देणाऱ्या झोमॅटो, स्वीगी आणि पिझ्झा डिलिव्हरीसुद्धा पूर्ण बंद राहणार आहे. या निर्यणावर बोलताना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं की, जर आम्ही पिझ्झा नाही खाल्ला तर आम्ही मरणार नाही.
हे वाचा : लॉकडाऊनमध्ये चिमुकलीचा पहिला बर्थडे पोलिसाने बनवला खास, पाहा VIDEO
तेलंगणा सरकारने म्हटलं की, 5 मे रोजी कॅबिनेटमध्ये राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ. सध्या विमानतळांवरून हवाई सेवा सुरु करू शकत नाही. तसंच स्वीगी, झोमॅटो आणि पिझ्झा डिलिव्हरीसाठीही परवानगी नाही.
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, पिझ्झा खाल्ला नाही म्हणून कोणी मरणार नाही. तसंच रमजानच्या काळातही कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. सर्वांना लॉकडाऊनचं पालन काटेकोरपणे करावं लागेल.
हे वाचा : महाराष्ट्रात का वाढतेय कोरोनाबाधितांची संख्या? हे आहे कारण