तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्याचा तेलंगाणा राज्य सरकारचा निर्णय

तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्याचा तेलंगाणा राज्य सरकारचा निर्णय

पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांदरम्यानच तेलंगणामधील विधानसभा निवडणुका होतील

  • Share this:

हैदराबाद, ०६ सप्टेंबर- तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी गुरूवारी बोलवलेल्या कॅबिनेट बैठकीनंतर तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तेलंगणात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या केल्या जातील. गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. आज पार पडलेल्या बैठकीत सर्व मंत्र्यांना उपस्थित राहणं अपरिहार्य होतं. विधानसभा बरखास्त झाल्यानंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव राज्यपालांना भेटायला गेले आणि लवकरात लवकर राज्यात निवडणुका व्हाव्यात अशी विनंती केली.

६ सप्टेंबरलाच का केले प्रदर्शन

विधानसभा बरखास्त करण्यासाठी राव यांनी निवडलेला आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पक्षातील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री राव यांना ६ हा अंक अत्यंत फायदेशीर आहे. राव यांच्यामते ही तारीख त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांदरम्यानच तेलंगणामधील विधानसभा निवडणुका होतील असे म्हटले जात आहे. मात्र या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या वेळी व्हाव्या अशी मुख्यमंत्री राव यांची इच्छा आहे. २०१४ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने ११९ जागांपैकी ६३ जागांवर विजय मिळवला होता.

VIDEO: समलैंगिकता गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरात जल्लोष

First published: September 6, 2018, 2:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading