तेलंगणा बस अपघातातल्या मृतांची संख्या 51 वर, 9 जणांची प्रकृती गंभीर

तेलंगणा बस अपघातातल्या मृतांची संख्या 51 वर, 9 जणांची प्रकृती गंभीर

तेलंगणा परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून आज 45 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 15 जण गंभीर जखमी झाले

  • Share this:

हैदराबाद,ता.11 सप्टेंबर : तेलंगणा परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून आज 51 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 9 जण गंभीर जखमी झाले. टीएसआरटीसी ही बस कोंदागट्टूवरून जगतियाल ला जात होती. बसमध्ये 60 प्रवासी होते. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्ता ओलांडून रस्त्याच्या खाली खोल खड्ड्यात कोसळली. मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. शनिवारपेट गावाजवळ हा भीषण अपघात झाला. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलंय. यात  32 पुरूष, 15 महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केलीय. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत कार्याला सुरवात केली. आसपासच्या भागातले लोकही मदत कार्यात सहभागी झाले.

बस अतिशय वेगात होती आणि अचानक बसने रस्ता सोडला आणि ती खाली कोसळली.

बस वेगात असल्याने बस घासत गेली आणि तीने पलटी खाल्ली. बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असल्याने मृतांची संख्या वाढल्याचं पोलिसांनी सांगितलं. जखमींना जगतियालच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बसला झालेला अपघात एवढा भीषण होता की बसमधल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बसचे पत्र कापावे लागले.

 

 

 

VIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण

First published: September 11, 2018, 3:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading