मराठी बातम्या /बातम्या /देश /BJP Presidnet Telangana : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाकडून मित्राला जबर मारहाण; गुन्हा दाखल, Video Viral

BJP Presidnet Telangana : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाकडून मित्राला जबर मारहाण; गुन्हा दाखल, Video Viral

तेलंगणा भाजप प्रदेशाध्यक्षाच्या मुलावर गुन्हा दाखल; वर्गमित्राला मारहाण केल्याचा आरोप

तेलंगणा भाजप प्रदेशाध्यक्षाच्या मुलावर गुन्हा दाखल; वर्गमित्राला मारहाण केल्याचा आरोप

तेलंगणातील भारतीय जनता पार्टीचे (बीजेपी) प्रदेशअध्यक्ष बंडी संजय यांचा मुलगा भगीरथ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Telangana, India

हैदराबाद, 18 जानेवारी : तेलंगणातील भारतीय जनता पार्टीचे (बीजेपी) प्रदेशअध्यक्ष बंडी संजय यांचा मुलगा भगीरथ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भगीरथने महिंद्रा विद्यापीठातील वर्गमित्राला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर भगीरथ आणि त्याच्या पाच मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (17 जानेवारी) व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये भगीरथ हा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याला मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे.

महिंद्रा युनिव्हर्सिटीकडून तक्रार मिळाल्यानंतर दुंडीगल पोलिसांनी भगीरथ आणि इतर पाच जणांविरुद्ध आयपीसी कलम 323 (स्वैरपणे दुसऱ्याला दुखापत करण्यासाठी शिक्षा), 341 (चुकीचा संयम), 504(शांतता भंग) आणि 606 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये निवडणुकाचे वाजले बिगुल, 16 फेब्रुवारीपासून मतदान आणि 2 मार्चला मतमोजणी

भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) सोशल मीडिया संयोजक वाय. सतीश रेड्डी यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. "@BJP4Telangana अध्यक्ष @bandisanjay_bjp यांच्या मुलाचं रॅगिंग आणि मारहाणीचं प्रकरण. त्यानं विद्यापीठातील त्याच्या सहकारी विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केली! या विद्यार्थ्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. @JPNadda यावर भाष्य करण्याचं धाडस करतील का?" असं कॅप्शन रेड्डी यांनी या व्हिडिओला दिलं आहे.

दरम्यान, श्रीराम नावाच्या मुलानं ही क्षुल्लक बाब असल्याचं म्हणत एक व्हिडिओही जारी केला आहे. "माझ्या मित्राच्या बहिणीची छेड काढल्यामुळे आमच्यात हा वाद झाला. मी त्याच्याशी चढ्या आवाजात बोलल्यानंतर आमच्यात भांडण झालं. हा एक क्षुल्लक मुद्दा होता. तरी हे प्रकरण का हायलाइट केलं जात आहे, हे मला माहीत नाही. आमच्यासाठी हे प्रकरण आता मिटलं आहे. आम्ही बॅचमेट आणि मित्र आहोत," असं तो म्हणाला.

वायएसआर यांनी जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल केल्याचा दावा केला आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला रुग्णालयात दाखल केलं नव्हतं.

बंडी संजय यांनीही या मुद्द्यावर एक निवेदन जारी करून ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडल्याचं सांगितलं आहे. "आता केसीआर आमच्या मुलांना या गलिच्छ राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अतिशय वाईट आहे... ही दोन महिन्यांपूर्वी घडलेली घटना आहे. केसीआर आता माझ्या मुलावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी विद्यापीठावर दबाव आणत आहेत," असं संजय यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

"तुम्ही (केसीआर) काहीही केलं तरी बंडी संजय मागे हटणार नाही. एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये माझ्या मुलाच्या बॅचमेटनं स्पष्टपणे सांगितलं आहे की, ही अंतर्गत समस्या होती. हे प्रकरण त्यांनी आपसात मिटवून घेतलं आहे. पण, केसीआर जाणूनबुजून माझ्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे…मी माझ्या मुलाला पोलिसांसमोर उभं करण्यास तयार आहे कारण, सत्य नक्कीच समोर येईल," असंही ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा : निवडणूक आयोग खरेदी करणार नवे EVM, कॅबिनेटने दिली मंजुरी!

समोर आलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये, संजय यांचा मुलगा दुसर्‍या एका घाबरलेल्या मुलाला अनेकदा तोंडात मारताना आणि मित्रांच्या गटासह त्याला धमकावताना दिसत आहे. ही घटना कधी घडली हे स्पष्ट झालेलं नाही. या दुसऱ्या व्हिडिओबद्दल अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

First published:

Tags: BJP, Telangana