ExitPoll: तेलंगणात ना भाजप ना काँग्रेस, या स्थानिक पक्षाचंच येणार सरकार!

ईम्स नाऊ आणि सीएनक्स यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष सत्ता स्थापन करू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2018 06:35 PM IST

ExitPoll: तेलंगणात ना भाजप ना काँग्रेस, या स्थानिक पक्षाचंच येणार सरकार!

हैद्राबाद, 7 डिसेंबर : तेलंगणामध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. आता या निवडणुकीबाबत एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. टाईम्स नाऊ आणि सीएनक्स यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष सत्ता स्थापन करू शकतो.

टाईम्स नाऊ आणि सीएनक्सच्या पोलमध्ये कोणाला किती जागा?

तेलंगणा राष्ट्र समिती – 66

काँग्रेस – 37

भाजप – 7

Loading...

इतर - 9

तेलंगणाबाबतचे इतर संस्थाचे एक्झिट पोल येणं बाकी आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या पाच राज्यांतील एक्झिट पोल समोर येत आहेत. या एक्झिट पोल्समधून प्रत्येकजण वेगवेगळे दावे करत असतो.

निवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल लागण्याआधी अनेकांचं या एक्झिट पोल्सकडे लक्ष लागलेलं असतं. प्रत्यक्षात यातील अनेक पोल चुकीचे ठरतात. तर काही एक्झिट पोल निकालाच्या जवळ जाणारे असतात.

एक्झिट पोल हे नेहमी मतदानाच्या दिवशीच केले जातात. मतदान केल्यानंतर जेव्हा मतदार पोलिंग बूथमधून बाहेर पडतात, तेव्हाच एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांकडून मतदारांना त्यांचं मत विचारलं जातं.

मतदारांनी सांगितलेल्या माहिती एक्झिट पोल करणाऱ्या संस्था एकत्रित करतात. या संस्था प्रत्येक मतदाराचंच मत विचारात घेत नाहीत. तर त्यांनी एक सॅम्पल साईज ठरवलेली असते.

वेगवेगळ्या परिसरातील, वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींशी बोलून ही माहिती जमा केली जाते. त्याआधारेच निवडणूक निकालांबाबत अंदाज बांधला जातो.

राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन मोठ्या राज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राजस्थानमध्ये सत्ताबदलाची 20 वर्षांची परंपरा कायम राहते की तुटते हे पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...