तेलंगणा निवडणूक: मतदार यादीतून गायब झालं ज्वाला गुट्टाचं नाव, ट्विटरवर भडकली

तेलंगणा निवडणूक: मतदार यादीतून गायब झालं ज्वाला गुट्टाचं नाव, ट्विटरवर भडकली

लोकशाहीच्या या पर्वात सर्वसामान्यापासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण रागेंत उभं राहून मतदान करतो. पण, मतदानाच्या यादीतून तुमचं नावच गायब झालं तर...

  • Share this:

राजस्थान/तेलंगणा, 07 डिसेंबर : सध्या राजस्थान आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. लोकशाहीच्या या पर्वात सर्वसामान्यापासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण रागेंत उभं राहून मतदान करतो. पण, मतदानाच्या यादीतून तुमचं नावच गायब झालं तर...

बरं इतकंच नाही तर ईव्हीएमदेखील खराब झाल्याची तक्रार केली जात आहे. हा सगळा प्रकार तेलंगणामध्ये घडला आहे. तेलंगणाच्या हैद्राबादमध्ये अनेक मतदारांचं मतदार यादीमध्ये नावच नव्हतं. यात सुप्रसिद्ध बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा हीचेदेखील नाव नाही आहे.

याबद्द्ल नाराजी व्यक्त करत ज्वाला गुट्टा हीने ट्विट केलं आहे. पहिल्यांदा गुट्टाने ट्विटमध्ये "माझं नाव मतदार यादीत नसल्याने मी वैतागले आहे" असं ट्विट केलं. त्यानंतर तिने दुसऱ्यांदा ट्विट केलं आणि त्यात लिहलं की, "हे निवडणूक कशा पद्धतीने खरी आहे. या लिस्टमध्ये तर माझं नावच नाही आहे"

ज्वाला गुट्टा ही मुळची हैदराबादची आहे. तिचा जन्म वर्धाला झाला आहे. गुट्टाचं संपूर्ण कुटुंब हे हैद्राबादमध्येच राहतं. त्यामुळे मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे गुट्टा हिने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. यावर तेलंगणा सरकार आता काय निर्णय घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. आज म्हणजे 7 डिसेंबरला राजस्थान आणि तेलंगनामध्ये विधानसभेसाठी मतदान करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या या रणसंग्रामात राजस्थानमध्ये भाजप आणि तेलंगणामध्ये टीआरएस सत्तेमध्ये आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सत्ताधारी पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.

शुक्रवारी राजस्थानमध्ये 199 जागांसाठी तर तेलंगणामध्ये 119 जागांसाठी मतदान होत आहे. तर राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात रामगड मतदार संघात बीएसपी उमेदवाराचे निधन झाल्यामुळे त्या ठिकाणी मतदान घेण्यात आलेलं नाही. तेलंगणामध्ये एकूण 119 जांगावर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

तेलंगणात नक्षल प्रभावित 13 जागांवर संध्याकाळी 4 वाजता आणि इतर जागांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर राजस्थानमध्ये सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या आजच्या मतदानाच्या रणधुमाळीत दुपारी 1 वाजेपर्यंत 41.33 टक्के मतदान झालं आहे. तर तेलंगणामध्ये 1 वाजेपर्यंत 43.24 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

VIDEO : जेव्हा पवार आजोबा नातीच्या गाडीतून घरी जातात

First published: December 7, 2018, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading