बापरे! पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं 70 कोटींचं घबाड, ACB ची मोठी कारवाई

बापरे! पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं 70 कोटींचं घबाड, ACB ची मोठी कारवाई

नरसिम्हा रेड्डी हा 1991 मध्ये इन्स्पेक्टर पदावर पोलीस विभागात रुजू झाला होता.

  • Share this:

हैदराबाद, 24 सप्टेंबर: तेलंगाणा पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याच्या घरात सुमारे 70 कोटी रुपयांचं घबाड सापडलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (Anti Corruption Bureau) ही कारवाई केली. मलकाजगिरी भागातील सहाय्यक पोलीस आयुक्त नरसिम्हा रेड्डी (Yelamakuri Narasimha Reddy) असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

हेही वाचा...तब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल

नरसिम्हा रेड्डी हा 1991 मध्ये इन्स्पेक्टर पदावर पोलीस विभागात रुजू झाला होता. तर काही दिवसांपूर्वी नरसिम्हा रेड्डी याला सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळाली होती. ACBनं हैदराबाद, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील इतर भागांत छापेमारी केली. त्यात नरसिम्हा रेड्डी याच्या नातेवाईकांच्या घरांवरही पोलिसांनी छापे टाकले होते.

मिळालेली माहिती अशी की, नरसिम्हा रेड्डी यानं गैरमार्गानं बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रेड्डीची मालमत्ता हुडकून काढण्यासाठी पोलिसांना तब्बल 20 ठिकाणी छापेमारी करावी लागली. त्यात करीमनगर, वारंगल आणि नालगोंडा येथील रेड्डीच्या नातेवाईकांच्या घरांचाही समावेश आहे.

नरसिम्हा रेड्डी याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. एवढंच नाही तर रेड्डी आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या बॅंक लॉकर उघडण्यात येण्त आहे. त्यातून आणखी मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.

रेड्डी यानं हैदराबाद येथील नाचाराम, हबसीगुडा, गुडीमलकापूर आणि घाटकेसर भागात जमिनीत मोठी गुंतवणूक केल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. घाटकेसर भागात रेड्ड यानं 33 एकर जमीन घेतली होती. या शिवाय त्यानं अनंतपूर जिल्ह्यात 55 एकर जमीन घेतली होती. एवढं नाही तर नरसिम्हा रेड्डी हा जमिनीच्या व्यवहारातून पैसा कमवत होता. उप्पल येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना रेड्डीनं गोरखधंदा सुरू केला होता.

दरम्यान, तेलंगाणा राज्यात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ACBने याच महिण्यात आणखी एक मोठी कारवाई केली होती. ACB नं इन्शुरन्स रेंस मेडिकल सव्हिसेसचे (आयएमएस) माजी व्यवस्थापक आणि एका अधिकाऱ्याच्या 4.47 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा भंडाफोड केला होता.

हेही वाचा...ड्रग्ज प्रकरणी दीपिकाची उद्या चौकशी; गुन्हा सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?

आयएमएसच्या माजी व्यवस्थापक देविका राणी (Devika Rani) यांच्याकडे 3.75 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळली होती. तर आयएसआय फार्मासिस्ट नागा लक्ष्मी (Naga Lakshmi)याच्याकडील रोख 72 लाख रुपये ACB नं जप्त केले आहेत. देविका राणी यांनी सायबराबाद परिसरात एका रियल एस्टेट कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 24, 2020, 7:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading