खळबळजनक घटना; महिला तहसीलदाराला कार्यालयातच पेट्रोल ओतून जिवंत जाळले

खळबळजनक घटना; महिला तहसीलदाराला कार्यालयातच पेट्रोल ओतून जिवंत जाळले

एका महिला तहसीलदारला त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळण्यात आले आहे.

  • Share this:

हैदराबाद, 04 नोव्हेंबर: तेलंगणा(Telangana)मधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना घडली आहे. जिल्ह्यातील एका महिला तहसीलदारला (Woman tahsildar)त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळण्यात आले आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. एका व्यक्तीने दुपारी तहसीलदार कार्यालयात आला आणि त्याने तहसीलदार विजया रेड्डी यांच्यावर पेट्रोल टाकले. त्यानंतर संबंधित व्यक्ती व्यक्ती आग लावली. ही घटना झाली तेव्हा तहसीलदार त्यांच्या ऑफिसमध्ये एकट्या होत्या. विजया यांच्यावर हल्ला करून संबंधित आरोपीने तेथून पळ काढला आणि काही वेळानंतर तो स्वत: पोलिसात हजर झाला. त्याचे नाव के. सुरेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेत विजया रेड्डी यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यास गेलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1.40च्या सुमारास तालुक्यातील गौरेली गावातील रहिवासी के.सुरेश तहसीलदार कार्यालयात आला. काही मिनिटे तो विजया रेड्डी यांच्याशी बोलला आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. या घटनेनंतर सुरेशने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना घडली तेव्हा कार्यालयातील एक महिला कर्मचारी आणि विजया रेड्डी यांचा चालक त्यांना वाचवण्यासाठी आला पण तोपर्यंत त्या पूर्णपणे भाजल्या होत्या.

घटनास्थळावरून पळ काढलेल्या सुरेश याने थेट पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. पोलिसांच्या चौकशीत एका जमीन प्रकरणात विजया यांनी मला त्रास दिल्याचे सांगितले. विजया यांच्यावर हल्ला करताना सुरेश देखील जखमी झाला. पोलिसंनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत आणखी दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  सुरेशवर आयपीसी कलम 302 (हत्या) आणि कलम 307 (हत्येचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या