हैदराबाद, 28 मे : तेलंगणातील मेडक इथे बुधवारी बोअरवेलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकला पडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफ टीम दाखल झाली. पापन्नापेट मंडल इथल्या पोड्चना पल्लीगाव इथली आहे. 13 तासांनंतर या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. पोलीस आणि एनडीआरएफकडून जवळपास 13 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपय़शी ठरली आहे.
Telangana: An operation is underway to rescue a 3-year-old child who fell into a borewell in Medak district. pic.twitter.com/TNOueyGGSJ
— Sairam Anupoju ™ (@SairamAnupoju_1) May 27, 2020
The three-year-old boy is still inside the borewell. We are not sure whether he is alive or not. NDRF teams have reached the spot. We are trying our best to bring the boy out from the well: Medak SP Chandana Deepti https://t.co/AxQxnF52Gi
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बोअरवेल खोदण्याचं काम बुधवारी कऱण्यात आलं. 120 ते 150 फूट खोल ही बोअरवेल असल्याचं सांगितलं जात होतं. एनडीआरएफ आणि पोलिसांनी या चिमुकल्याचा जीव वाचवण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांची झुंज अपयशी ठरल्यानं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चिमुकला आपल्या आजी-आजोबांकडे आला होता. खेळता खेळता पाय घसरून हा चिमुकला थेट बोअरवेलमध्ये गेला. आपला मुलगा खूप वेळेपासून कुठे दिसत नाही म्हणून कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर बोअरवेलमधून त्यांना आवाज आला. पालकांनी चिमुकल्याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा चिमुकला साधारण 25 फुटांवर अडकला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुलाला बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबी, दोन क्रेन आणि तीन रुग्णवाहिका आणि दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत. हैदराबादहून बचाव कार्यासाठी एक विशेष पथकही बोलवण्यात आलं होतं मात्र चिमुकल्यानं तोपर्यंत आपले प्राण सोडले होते.