मराठी बातम्या /बातम्या /देश /ऐकावं ते नवलचं! देशात पहिल्यांदाच 3 फुट उंचीच्या व्यक्तीला मिळालं Driving Licence गिनीज बुकपर्यंत भाऊची हवा!

ऐकावं ते नवलचं! देशात पहिल्यांदाच 3 फुट उंचीच्या व्यक्तीला मिळालं Driving Licence गिनीज बुकपर्यंत भाऊची हवा!

कोणतही वाहन चालवण्यासाठी वाहन परवाना (Driving Licence) आवश्यक आहे. यासाठी काही पात्रता निकष आहेत. यापैकी महत्वाचं म्हणजे फिटनेस प्रमाणपत्र. पण, आम्ही तुम्हाला सांगितलं की 3 फूट उंचीच्या व्यक्तीला गाडी चालवण्याचा परवाना मिळाला तर? विश्वास बसणार नाही ना? मग ही बातमी वाचा.

कोणतही वाहन चालवण्यासाठी वाहन परवाना (Driving Licence) आवश्यक आहे. यासाठी काही पात्रता निकष आहेत. यापैकी महत्वाचं म्हणजे फिटनेस प्रमाणपत्र. पण, आम्ही तुम्हाला सांगितलं की 3 फूट उंचीच्या व्यक्तीला गाडी चालवण्याचा परवाना मिळाला तर? विश्वास बसणार नाही ना? मग ही बातमी वाचा.

कोणतही वाहन चालवण्यासाठी वाहन परवाना (Driving Licence) आवश्यक आहे. यासाठी काही पात्रता निकष आहेत. यापैकी महत्वाचं म्हणजे फिटनेस प्रमाणपत्र. पण, आम्ही तुम्हाला सांगितलं की 3 फूट उंचीच्या व्यक्तीला गाडी चालवण्याचा परवाना मिळाला तर? विश्वास बसणार नाही ना? मग ही बातमी वाचा.

पुढे वाचा ...

हैद्राबाद, 1 डिसेंबर : देशात कोणतंही वाहन चालवण्याकरिता आवश्यक असलेलं ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) मिळवण्यासाठी काही निकष, नियम आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कागदपत्रांसोबत संबंधित व्यक्तीचं फिटनेस प्रमाणपत्रही (Fitness Certificate) गरजेचं असतं. या पार्श्वभूमीवर गट्टीपल्ली शिवलाल (Gattipally Shivalal) या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं ही मोठी गोष्ट म्हणावी लागेल. कारण गट्टीपल्ली शिवलाल यांची उंची केवळ 3 फूट असून, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणारे ते देशातले पहिले ठेंगू (Dwarf) व्यक्ती ठरले आहेत.

कमी उंची असलेल्या व्यक्तींच्या गटात प्रथमच ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानं गट्टीपल्ली शिवलाल यांच्या या विशेष प्रयत्नांची नोंद तेलुगू बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड (Limca Book of Records) आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं (Guinness Book of World Records) घेतली आहे. तसंच तेलंगण सरकारनं त्यांची झिरो-गिअर ऑटोमेटेड कार अधिकृतदेखील केली आहे.

42 वर्षांचे गट्टीपल्ली शिवलाल हे हैद्राबादमधल्या कुकटपल्ली इथल्या एका खासगी कंपनीत नोकरी करतात. `उंची कमी असल्यामुळे प्रवास करणं दिवसेंदिवस कठीण जात होतं. मला गाडी चालवता येत नसल्यानं सार्वजनिक वाहतूक किंवा कॅबवर अवलंबून राहावं लागत असे. परंतु, कॅब ड्रायव्हर, अन्य प्रवासी मला वाहन चालवताना पाहून हसायचे, माझ्यावर कमेंट्स करायचे. यावर काही तरी उपाययोजना केली पाहिजे असं मला वारंवार वाटत होतं. असं मनोमन वाटत होतं. काहीही झालं तरी आपण कार चालवायला शिकायचं आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचं असा निश्चय मी केला,` असं गट्टीपल्ली शिवलाल यांनी सांगितलं.

पेट्रोल-डिझेल विसरा, आता येणार हायड्रोजनवर चालणारी Car

परंतु, हा विचार प्रत्यक्षात येण्यासाठी करावी लागलेली वाटचाल सोपी नव्हती. कारण माझ्याकडे कार असतानाही ड्रायव्हिंग येत नसल्यानं कार चालवणं केवळ अशक्य होतं. ड्रायव्हिंग शिकण्यासाठी मी शहरातल्या 120 हून अधिक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये (Driving School) गेलो. परंतु, ड्रायव्हिंग स्कूलचालकांनी मला विविध कारणं देत शिकवण्यास नकार दिला,` असं शिवलाल यांनी सांगितलं.

दरम्यान एक दिवस युनायटेड स्टेट्समधली (United States) एक बुटकी व्यक्ती कार चालवतानाचा व्हिडिओ मी पाहिला. त्यानंतर ड्रायव्हिंग शिकण्याची माझी इच्छा अजून बळावली. मेकॅनिक्स शिकण्यासाठी मी संपूर्ण अमेरिकेत प्रवास केला. त्यानंतर हैदराबादमध्ये (Hyderabad) मला कस्टम कारचं डिझाइन करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती मिळाली. या व्यक्तीकडून मी कारमध्ये काही बदल करून घेतले. या कारमधली पेडल्स नेहमीपेक्षा उंचावर होती आणि माझे पाय तिथपर्यंत पोहोचू शकत होते. आता आपल्याला कार चालवणं अवघड जाणार नाही, असा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला,` असं गट्टीपल्ली यांनी सांगितलं. `माझा मित्र इस्माईलमुळे मी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवू शकलो. जागतिक विक्रमापर्यंत पोहोचलो,` असं ते आवर्जून नमूद करतात.

India's Safest Car: 'या' आहेत देशातील सर्वात सुरक्षित फोर व्हीलर

सध्या शिवलाल त्यांच्या पत्नीला ड्रायव्हिंग शिकवत असून, प्रवासाबाबत अनेक बुटक्या व्यक्ती स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टिकोनातून शहरात एक स्पेशल ड्रायव्हिंग स्कूल (Special Driving School) सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. या उपक्रमासाठी राज्य सरकारनं काही मदत केल्यास अनेक बुटक्या व्यक्ती गाडी चालवायला शिकतील आणि स्वावलंबी होतील, असं त्यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Car, Driving license, Hyderabad