लालूंच्या कुटुंबात यादवी : आधी पत्नीला घटस्फोट आणि आता भावाला आव्हान

लालूंच्या कुटुंबात यादवी : आधी पत्नीला घटस्फोट आणि आता भावाला आव्हान

लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव हे काही काळ राजकारणापासून दूर होते. पण आता मात्र त्यांनी उमेदवारांची नावं घोषित करून तेजस्वी यादव यांची डोकेदुखी वाढवली आहे. तेजप्रताप यादव यांनी दोन जागांवरच्या उमेदवारांची नावंही घोषित करून टाकली.

  • Share this:

पाटणा, २८ मार्च : बिहारमधलं महागठबंधन वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रीय जनता दलामध्येच फूट पडल्याचं समोर आलं आहे.

लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव हे काही काळ राजकारणापासून दूर होते. पण आता मात्र त्यांनी उमेदवारांची नावं घोषित करून तेजस्वी यादव यांची डोकेदुखी वाढवली आहे. तेजप्रताप यादव यांनी दोन जागांवरच्या उमेदवारांची नावंही घोषित करून टाकली.

तेजप्रताप यासाठी पत्रकार परिषदही घेणार होते. पण लालूप्रसाद यादव यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेणं मात्र टाळलं. एवढं सगळं झाल्यानंतर, मी राष्ट्रीय जनता दलाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.

पत्नीशी घटस्फोट

तेजप्रताप यादव यांच्यामुळे आधीच लालूप्रसाद यादव यांचं कुटुंब अडचणीत आलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीवर आरोप करून तिच्याशी घटस्फोट घेण्याचा दावा दाखल केला आहे. सोशल मीडियातून ते वारंवार वेगवेगळी वक्तव्य करत असतात. एकीकडे घटस्फोटाचा दावा करायचा आणि दुसरीकडे, मी राधेच्या शोधात आहे, असं म्हणायचं यामुळे ते वादात सापडले होते.

गायी आणि बासरी

याआधी, तेजप्रताप यादव यांनी शंकराचं आणि कृष्णाचं रूप घेतल्यामुळेही ते चांगलेच चर्चेत होते. त्यांनी मथुरेचा दौरा करून कान्हाचं रूप धारण केलं होतं. गायींच्या मध्ये उभं राहून बासरी वाजवतानाचा त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तेजप्रताप यादव यांनी कुरुक्षेत्राचाही दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्याचीही जोरदार चर्चा झाली.

तेजप्रताप यादव आता पुन्हा निवडणुकांच्या कुरुक्षेत्रात उतरले आहेत. आपल्या दोन उमेदवारांची नावं घोषित करून त्यांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये दबावाचं राजकारण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलामध्ये जोरदार यादवी माजली आहे.

=====================================================================================================================================

VIDEO : ...तर हीच बॅट डोक्यात घालणार', अर्ज भरताना राजू शेट्टींची आक्रमक प्रतिक्रिया

First published: March 28, 2019, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading