विमानासारख्या सुविधा, नावासारखीच 200 किमीप्रति तास धावणारी तेजस एक्स्प्रेस !

विमानासारख्या सुविधा, नावासारखीच 200 किमीप्रति तास धावणारी तेजस एक्स्प्रेस !

  • Share this:

20 मे : मुंबई ते गोवा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, पर्यटकांसाठी 22 मेपासून मुंबई ते गोवा हा प्रवास फक्त 8 तासांत पूर्ण करू शकतील. कारण या मार्गावर धावणार आहे तेजस एक्स्प्रेस.

तेजस एक्स्प्रेस उद्या रविवारी सकाळी मुंबईत दाखल होणार असून 22 मेला ती गोव्याला रवाना होईल. दर आठवड्यात 5 दिवस ही धावणार असून सकाळी 5 वाजता मुंबईवरुन तर दुपारी अडीच वाजता करमाळी वरुन सुटेल. विशेष म्हणजे या एक्स्प्रेसचं वेग आहे 200 किमी प्रति तास. त्यामुळे मुंबई ते गोवा हे अंतर 8 तासांत पूर्ण करता येणार आहे. या तेजस एक्स्प्रेसमध्ये विमानाप्रमाणेच सोईसुविधा आहे.

कशी आहे तेजस एक्स्प्रेस ?

ही ट्रेन प्रति तास 200 किमी या वेगाने धावू शकते

20 डब्यांची तेजस एक्स्प्रेस

मेट्रोसारखे स्वयंचलित दरवाजे

आग शोधक यंत्रणा असेल

बायो वॅक्युम टॉलेटमुळे पाण्याची बचत

प्रत्येक सीटसमोर टचस्क्रिन एलसीडी

प्रत्येक डब्यात टी कॉफी वेंडिंग मशीन

वायफाय सुविधा

प्रत्येक सीटला कॉल बेल

स्नॅक टेबलची सोय

First published: May 20, 2017, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading