27 नोव्हेंबर: बिहारचे पूर्व मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची झेड प्लस सेक्युरिटी काढून झेड सेक्युरिटी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयावर संतप्त होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू, असं वादग्रस्त विधान राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांनी केलंय.
सरकारने लालू यांची सुरक्षा झेड प्लस (Z+) वरून झेड (Z) केलीय. तसंच त्यांचं एनएसजी कमांडोंचं सुरक्षा कवच काढून घेतलंय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या 23 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत देशभरातील व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यावेळी काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय झाला. यात लालूंच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. यावर तेज प्रताप यादवनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच संदर्भात वादग्रस्त विधान केलंय. यापूर्वी त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या मुलाच्या लग्नात तोडफोड करण्याची धमकी दिली होती.तसंच लालू प्रसाद यादव यांच्या आयुष्याला धोका असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. बिहारमधील अजूनही काही नेत्यांची झेड सेक्युरिटी कमी केली आहे. त्यात जीतन राम मांझी यांचं नावही आहे.
काही दिवसांपूर्वी राबडी देवी यांनीही मोदींचे हात पाय कापणारे भरपूर आहेत असं वक्तव्य केलं होतं. लालूंची भाषाही आधीपासूनच शिवराळ आहे. पण आता लालूंची मुलंही अशीच भाषा बोलू लागले असल्यामुळे सगळीकडून टीकेची झोड उठवली जाते आहे.
#WATCH: Lalu Yadav's son Tej Pratap responds to question on his father's security downgrade, says, 'Narendra Modi Ji ka khaal udhedva lenge' pic.twitter.com/FER7rIBjoK
— ANI (@ANI) November 27, 2017
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Lalu prasad yadav, Tej pratap yadav