सलग 6 तास खेळत होता PUBG; गेममधलं कॅरॅक्टर मारलं गेल्याच्या धक्क्याने झाला मृत्यू

सलग 6 तास खेळत होता PUBG; गेममधलं कॅरॅक्टर मारलं गेल्याच्या धक्क्याने झाला मृत्यू

मोबाईलवर गेम खेळता खेळता एका 16 वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तो सलग 6 तास PUBG खेळत होता आणि त्यातलं कॅरॅक्टर ठार झालं, त्याच वेळी यालासुद्धा मृत्यू आला.

  • Share this:

भोपाळ, 31 मे : मोबाईलवर सलग 6 तास PUBG गेम खेळल्यानंतर 16 वर्षाच्या मुलाचा अकस्मात मृत्यू झाला आहे. फुरकान कुरैशी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो सलग 6 ताल मोबाईवर गेम खेळत होता, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. त्या गेममधलं कॅरॅक्टर ठार झाल्यावर त्याच्या धक्क्याने फुरकानलाही हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.  मध्य प्रदेशातील नीमच येथे ही घटना घडली.

फुरकान मृत्यूपूर्वी तो ब्लास्ट कर, ब्लास्ट कर असं ओरडल्याची माहिती यावेळी त्याचे वडील हारून राशिद कुरैशी यांनी दिली. फुरका न कुरैशीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मनावर ताण आल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. फुरकान कुरैशी हा नसीराबदमध्ये केंद्रीय विद्यालयात बारावीमध्ये शिकत होता. नीमचमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर तो एका लग्नासाठी म्हणून आला होता.

मोठा घातपात टळला; माओवाद्यांनी 4 ठिकाणी पेरले होते भूसुरुंग

गेममध्ये कॅरेक्टरचा मृत्यू झाला आणि...

फुरकान 25 मे रोजी रात्री 2 वाजेपर्यंत PUBG खेळत होता. त्यानंतर तो 26 मे रोजी सकाळी उठला. खाणं खाल्ल्यानंतर तो सलग 6 तास PUBG खेळत होता. ज्यावेळी PUBG गेममधील फुरकानच्या कॅरेक्टरचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा देखील मृत्यू झाला.

मृत्यूपुर्वी फुरकान हा जोर जोरात ओरडत होता. अयान तु मला मारलंस. मी हरलो. आता मी तुझ्यासोबत राहणार नाही असं फुरकान मृत्यूपूर्वी बोलल्याचं त्याच्या भावानं सांगितलं.

भाजप नेत्याची हत्या; झोपेत असताना केला हल्ला

डॉक्टरांचं आवाहन

याप्रकरणामध्ये डॉक्टरांची प्रतिक्रिया विचारले असता त्यांनी, मुंल गेममधील पात्राच्या अधीन होतात. अतिउत्साही झाल्यानं कार्डिअक अरेस्टचा धोका मुलांना वाढतो. ही गोष्ट मुलांच्या जीवावर बेतू शकते. सध्या मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुलांना अशा गेम्सपासून लांब ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

बीडमध्ये EVM बाबत धनंजय मुंडेंचा धक्कादायक दावा, पाहा VIDEO

First published: May 31, 2019, 12:26 PM IST
Tags: PUBG

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading