मुंबई, 16 डिसेंबर : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) उभारणीसाठी असलेले सर्व अडथळे सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालानंतर दूर झाले. या मंदिराचं आता काम सुरु झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते याचं भूमिपूजन देखील पाच ऑगस्ट रोजी पार पाडलं. या मंदिरनिर्मितीसाठी जगभरातून निधी संकलन देखील केले जात आहे. लाखो लोकांचं लक्ष लागून राहिलेल्या राम मंदिराच्या निर्मितीमध्ये आता एक नवं विघ्न निर्माण झालं आहे.
राम मंदिराचा पाया असलेल्या जमिनीखाली वाळूमिश्रीत माती सापडली आहे. ही माती मंदिर निर्मितीसाठी योग्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. हे भव्य मंदिर अनेक मोठ्या दगडांना आकार देऊन उभारलं जाणार आहे. त्यामुळे या दगडांना पेलू शकेल अशी माती मंदिराच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. पायाखाली सापडलेली माती त्यासाठी योग्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. या बांधकामाची चाचणी करत असताना दगड अचानक खाली घसरला. त्यानंतर केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली. ‘नवभारत टाईम्स’ नं हे वृत्त दिलं आहे.
समितीची स्थापना
श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टकडे या मंदिराच्या उभारणीची जबाबदारी आहे. त्यांनी या अडचणींवर मात करण्यासाठी आयआयटी इंजिनिअर्ससह काही तज्ज्ञ व्यक्तींची मदत मागितली आहे. या विषयावर एका उपसमितीची देखील स्थापना करण्यात आली असून त्याच्या रिपोर्टनंतर ही सर्व प्रक्रीया नव्यानं सुरु करण्यात येणार आहे.
हे वाचा-'मुस्लीम समाजासाठी भारत धोकादायक आणि हिंसक', अल्पसंख्याक अहवालातील निरिक्षण
प्रस्तावित राम मंदिरामध्ये 1200 खांब उभारण्याची योजना आहे. हे स्तंभ उभारण्यासाठी लागणारे पिलर्स उभारण्यापूर्वी 12 नमुना खांब आयआयटी मद्रासच्या टीमनं बनवले होते. या खांबांवर वजन टाकण्यात आलं त्यावेळी त्याच्या पायाशी असलेली जमीन काही इंच दबली गेली. त्यावेळी ती माती वाळूममिश्रित असल्याचं निष्पन्न झाले.
आयआयटीची टीम शोधणार मार्ग
राम मंदिर उभारणीतला हा अडथळा दूर करण्यासाठी आयआयटीमधील एक टीम मार्ग शोधणार आहे. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या तज्ज्ञांची देखील यात मदत घेतली जाणार आहे.