Teachers day: गुगल डुडलकडून शिक्षक दिनाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

Teachers day: गुगल डुडलकडून शिक्षक दिनाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.

  • Share this:

मुंबई, 05 सप्टेंबर: (Teachers day) आपल्या आयुष्यात शिक्षकाला महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षकांचा सन्मान आदर आणि गौरव करणारा दिवस म्हणून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुगलने खास डुडल तयार केलं आहे. गुगलने जगभरातील सर्व शिक्षकांना डुडलद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत.

फळ्यासमोर उभा असलेला ऑक्टोपस विज्ञान, गणित, संगित, कला, भाषा, असे विविध विषय शिकवत आहे. असं गुगल डुडलमध्ये ग्राफिक्सद्वारे दाखवण्यात आलं आहे.

दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (Teachers day ) म्हणून साजरा केला जातो.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन चा जन्मदिवस आणि स्मृतिदिन म्हणून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. ते एक उत्तम शिक्षक होते. 1909 ते 1948 असा 40 वर्ष त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून कार्यभार सांभाळला. सोबतच स्वतंत्र भारताचे ते पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. 1962 साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती झाले तेव्हापासून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन साजरा होतो. या खास दिवशी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सरकारतर्फे सन्मान केला जातो.

शिक्षक दिनाचं महत्त्व

आई-वडिलांनंतर आपल्या आयुष्यात योग्य मार्गदर्शन करणारे आपले गुरू अर्थातच शिक्षक असतात. पूर्वी गुरुकुलात जाऊन शिक्षण घेण्याची पद्धत होती. मात्र काळानुरूप ती मागे पडली. शिक्षकांनी वर्षभर दिलेल्या विद्येच्या जोरावर विद्यार्थी या दिवशी विविध माध्यमांतून मानवंदना देतात. अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये या दिवशी विद्यार्थी एकमेकांना विषय शिकवतात. तर काही ठिकाणी नृत्य, कला, संगीत, चित्र अशा विविध माध्यमांतून शिक्षकांना गुरूवंदना आणि आदर व्यक्त केला जातो.

News18 Lokmat वर दिसेल तुमचा बाप्पा; असे व्हा स्पर्धेत सहभागी

SPECIAL REPORT : या कारणामुळे आली आहे मंदी, पाहा VIDEO

First published: September 5, 2019, 9:44 AM IST

ताज्या बातम्या