मराठी बातम्या /बातम्या /देश /

राहुल गांधींची भेट घेणं शिक्षकाला महागात पडलं; 'या' कारणामुळे आयुक्तांनी नोकरीवरुनच काढलं

राहुल गांधींची भेट घेणं शिक्षकाला महागात पडलं; 'या' कारणामुळे आयुक्तांनी नोकरीवरुनच काढलं

कुजरी विद्यालयातील प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश कनोजे सध्या चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे 24 नोव्हेंबर रोजी त्यांनी आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांसह भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांची भेट घेतली, पण..

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India

मुंबई 03 डिसेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीपर्यंत ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली आहे. ही यात्रा सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे. राज्यातील विविध भागांतील लोक यात्रेत सहभागी होत आहेत आणि राहुल गांधींना भेटत आहेत. अशातच बडवानी जिल्ह्यात घडलेल्या एका प्रकाराने लक्ष वेधून घेतलंय. इथल्या कुजरी विद्यालयातील प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश कनोजे सध्या चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे 24 नोव्हेंबर रोजी त्यांनी आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांसह भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर बोलल्यानंतर त्यांना धनुष्यबाण भेट दिला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बडवानीच्या सहायक आयुक्तांनी राजेश यांना निलंबित करण्याचे आदेश काढले.

'आता आझाद मैदानावर जायचं', राज्यपालांविरोधात उदयनराजेंची रायगडावरून गर्जना

राजकीय पक्षाच्या रॅलीत सहभागी होऊन त्यांनी मध्य प्रदेश नागरी सेवा-1965 च्या नियम-5 चं उल्लंघन केल्याचं निलंबनाच्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे राजेश यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे, असं कारण त्यांनी दिलंय. दरम्यान, आता या विषयावरून राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस आमदार आणि माजी गृहमंत्री बाला बच्चन यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे शिवराज सिंह चौहान यांची झोप उडाल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच अनेक सरकारी कर्मचारी राजकीय कार्यक्रमात सहभागी होतात, यात गैर काय, असंही ते म्हणाले.

शिक्षकावरील कारवाईची ऑर्डर आपण पाहिली आहे. ती पाहून तरी भाजप आणि शिवराज सिंह चौहान घाबरले आहेत, हेच स्पष्ट होतंय. पण वेळ आल्यावर मध्य प्रदेश आणि देशातील जनताच याचं उत्तर देईल, असंही बच्चन यांनी म्हटलंय.

Solapur Akkalkot Border : '75 वर्षांत काही दिलं आता आम्हाला जाऊ द्या', सोलापूरमधील गावकऱ्यांनी फडकावले कर्नाटकचे झेंडे

प्रकरणावर सहायक आयुक्तांचं मौन

दरम्यान, शिक्षकाला निलंबित केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलंय, पण सहायक आयुक्त नीलेश रघुवंशी यांनी याबद्दल मौन बाळगलं आहे. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

शिक्षक राजेश कनोजे काय म्हणाले

"मी एक शिक्षक आहे. राहुल गांधींना भेटल्यामुळे मला निलंबित करण्यात आलं आहे. आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत मी राहुल गांधींना भेटलो. आमच्या जल-जंगल-जमीन कंपन्यांच्या हातात जात आहेत. वन कायद्यांतर्गत जे अधिकार आमच्या लोकांना मिळायला हवे, ते मिळत नाहीयेत," असं आपण राहुल गांधींना सांगितल्याचं राजेश कनोजे म्हणाले.

First published:

Tags: Rahul gandhi, School teacher