शिक्षिकेनं पेन्सिल घेऊन विद्यार्थिनींवर केले नको ते अत्याचार, व्हिडिओ पाठवला प्रियकराला!

शिक्षिकेनं पेन्सिल घेऊन विद्यार्थिनींवर केले नको ते अत्याचार, व्हिडिओ पाठवला प्रियकराला!

ही शिक्षिका खासगी कोचिंग क्लासेस घेत होती. तिने आपल्या घरी 6 आणि 3 वर्षांच्या मुलींवर अनैसर्गिक अत्याचार केले.

  • Share this:

मध्य प्रदेश, 11 जानेवारी : देशभरात महिला आणि लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. मध्यप्रदेशमधील इंदूर जिल्ह्यात शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिला शिक्षिकेनं आपल्या विद्यार्थिनींसोबत अनैसर्गिक अत्याचार केले आणि त्यांनतर याचा व्हिडिओ तयार करून आपल्या प्रियकराला पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही शिक्षिका खासगी कोचिंग क्लासेस घेत होती. तिने आपल्या घरी 6 आणि 3 वर्षांच्या मुलींवर अनैसर्गिक अत्याचार केले. या चिमुरड्यांच्या प्राईव्ह पार्टमध्ये पेन्सिल टाकून त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ तिने आपल्या प्रियकरालाही पाठवले.

जेव्हा पीडित मुली ट्युशन संपल्यानंतर आपल्या घरी गेल्या  तेव्हा होत असलेल्या त्रासाबद्दल आईला सांगितलं. जेव्हा आईने नेमकं काय झालं हे विचारलं असता मुलांनी हकीकत सांगितल्यानंतर त्याना मोठा हादरा बसला. या शिक्षिकेनं दोन्ही मुलींसोबत हे अमानवीय कृत्य केलं.

त्यानंतर आई-वडिलांनी थेट पोलीस स्टेशमध्ये धाव घेतली. त्यानंतर या 19 वर्षीय शिक्षिका आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या दोघांच्या किळसवाण्या कृत्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांनी बेड्या ठोकल्या. जेव्हा या शिक्षिका आणि तिच्या प्रियकराला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं, तेव्हा पीडित मुलींच्या नातेवाईकांचा संतापाच उद्रेक झाला आणि या दोघांना चांगलाच चोप दिला.

पोलिसांनी सांगितलं की, या पीडित मुलींना जेव्हा त्रास होऊ लागला होता. तेव्हा या शिक्षिकेनं त्यांना कपडे घालण्यास सांगून पुन्हा शिकवत होती. जेव्हा या मुली घरी पोहोचल्या तेव्हा शिक्षिकेच्या हीनकस कृत्याबद्दल वाचा फोडली.

पोलिसांनी आरोपी शिक्षिकेवर अनैसर्गिक कृत्य, लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. या दोघांचीही पोलीस चौकशी करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 07:31 PM IST

ताज्या बातम्या