• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • चहा टपरीच्या जोरावर 26 देश फिरणारे आजोबा गेले; 300 रुपयांच्या बचतीवर जग फिरणारं जोडपं

चहा टपरीच्या जोरावर 26 देश फिरणारे आजोबा गेले; 300 रुपयांच्या बचतीवर जग फिरणारं जोडपं

चहा विकून जग फिरणारे म्हणून ओळख असणारे के. आर. विजयन यांचं शुक्रवारी (19 नोव्हेंबर) निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. फक्त चहाच्या छोट्याच्या दुकानावर त्यांनी कमाई आणि बचत करून पत्नीसह जग पाहिलं होतं.

  • Share this:
तिरुवनंतपुरम, 19 नोव्हेंबर: जग फिरण्याचं (World tour dream) अनेकांचं स्वप्नअसतं. काही जणांचं हे स्वप्नपूर्ण होतं, तर काही जणांचं मात्र हे स्वप्न पैशांअभावी अपूर्णच राहतं. खरोखरच इच्छा असेल तर अगदी सर्वसामान्य परिस्थिती असूनही साधं जगणं आणि बचत करणं यातून जग फिरण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कोच्चीमधल्या (Tea seller in Kochi world tour) विजयन दाम्पत्यानं (Vijayan Couple) हेच दाखवून दिलं होतं. या विजयन दाम्पत्यामधले पती के. आर. विजयन यांचं शुक्रवारी (19 नोव्हेंबर) निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. दररोज 300 रुपयांची बचत के. आर. विजयन यांचं कोच्चीमध्ये (Kochi) चहाचं एक छोटंसं दुकान होतं. या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांनी आतापर्यंत 26 देशांना भेटी दिल्या. दरमहा आपल्या उत्पन्नातून 300 रुपयांची बचत ते करत असत. ‘श्री बालाजी कॉफी हाउस’ नावाचं दुकान विजयन आणि त्यांची पत्नी मोहना गेली 47 वर्षं चालवायचे. पैसे कमी पडत असतील तर ते बँकेकडून कर्ज घेत असत; पण जगातल्या विविध देशांना त्यांनी भेटी दिल्या. 6 खंडातले 26 देश त्यांनी पाहिले. गेल्याच महिन्यात ते रशियाच्या दौऱ्यावरून परतले होते. यशोगाथा: 27 व्या वर्षी 10 हजार कमावणारे विजय शेखर यांची आताची कमाई थक्क करणारी गेल्या 16 वर्षांमध्ये त्यांनी 26 देशांचे दौरे केले. विजयन दाम्पत्यापासून प्रेरणा देऊन केरळमधल्या अनेकांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि जग फिरण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केली. TEDx सारख्या विविध प्लॅटफॉर्मवर आपले प्रवासाचे अनुभव मांडण्याची संधी त्यांना मिळाली. सप्टेंबर 2021 मध्ये रशियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी या दाम्पत्यानं केरळचे पर्यटनमंत्री पी. ए. मोहम्मद रियाज यांचीही भेट घेतली होती. मृत्यूपूर्वी माणूस काय करतो? नर्सचा दावा वाचून तुम्हालाही बसेल धक्का! आतापर्यंत या दाम्पत्यानं अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड, ब्राझील, अर्जेंटिना आणि पेरूसह 26 देशांचा दौरा केला आहे. विजयन यांच्या निधनामुळे 40 वर्षं एकत्र असलेल्या या जोडप्याची ताटातूट झाली आहे. विजयन यांच्या निधनापूर्वी हे दाम्पत्य रशियाला गेलं होतं. 2007 मध्ये आपल्याकडे परदेश प्रवासाएवढा पुरेसा पैसा साठला आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी परदेश प्रवासाला सुरुवात केली. इस्रायल हा त्यांचा पहिला परदेश प्रवास होता. 2019 च्या डिसेंबर महिन्यापूर्वी विजयन दाम्पत्य ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेले होते. कोरोना साथीपूर्वीचा हा त्यांचा शेवटचा दौरा होता. Climate change मुळे गंगा नदीच्या प्रवाहात बदल! पुराचा धोका वाढला! एरव्ही घराच्या जबाबदाऱ्या, संसाराच्या कटकटी यातून अनेक जण आपली स्वप्नं बासनात गुंडाळून ठेवतात; पण विजयन यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून घराची जबाबदारी उचलली, तरीही जग फिरण्याचं आपलं स्वप्न तसंच ताजं ठेवलं. त्यामुळेच अगदी पहिल्या दिवसापासून ते त्यांच्या उत्पन्नातून 300 रुपये बाजूला टाकत गेले आणि स्वप्नपूर्ती करत राहिले. अनेकांची प्रेरणा असलेल्या विजयन यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं; पण त्यांनी दिलेली प्रेरणा अनेकांबरोबर कायम राहणार आहे.
First published: