आयकर विभागाच्या छाप्याविरोधात TDP खासदार जयदेव गाला यांचा मोर्चा

आयकर विभागाच्या छाप्याविरोधात TDP खासदार जयदेव गाला यांचा मोर्चा

टीडीपी खासदार जयदेव गाला यांनी आयकर विभागाच्या धाडीविरोधात मोर्चा काढला.

  • Share this:

हैद्राबाद, 10 एप्रिल : दोनच दिवसांपूर्वी आयकर विभागानं देशातील 50 ठिकाणी छापेमारी करत करोडो रूपये जप्त केले होते. छापेमारी केलेल्यांमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रविण कक्कड यांचा देखील समावेश होता. दरम्यान, आयकर विभागाचं टीडीपी खासदार जयदेव गाला यांच्या घरी देखील छापेमारी केली होती. केंद्र सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सीबीआय, आयकर विभागासारख्या संस्थांचा वापर करत असल्याची टीका जयदेव गाला यांना 'न्यूज18 नेटवर्क'शी बोलताना केली. या छाप्याविरोधात गाला यांनी आपल्या समर्थकांसह गुंटूर ते पट्टाभिपुरम असा मोर्चा देखील काढला. आयकर विभागानं केलेल्या छापेमारीमध्ये जयदेव गाला हे टीडीपीचे चौथे खासदार आहेत ज्याच्या घरी आयकर विभागानं छापमारी केली. सरकारविरोधीत अविश्वास दर्शक ठराव हा जयदेव गाला यांनी मांडला होता.


राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला मोठा धक्का


कोण आहेत जयदेव गाला?

जयदेव गाला मागील दशकापसून राजकारणात सक्रिय आहेत. अमर राजा ग्रुप ऑफ कंपनीचे ते मालक आहे. 2014मध्ये लोकसभा निवडणूक लढवताना जयदेव गाला यांनी आपली संपत्ती 683 कोटी रूपये असल्याचं म्हटलं होतं. चित्तूर हे गाला यांचं मुळ गाव आहे. जयदेव गाला यांचा पत्नी पद्मवती यांचे वडील कृष्णा हे तेलगु चित्रपट सृष्टीतील बडे प्रस्थ आहेत. त्याचं नाव एनटीआर आणि एएनआर यांच्यासोबत घेतलं जातं. कृष्णा यांचा मुलगा महेश बाबु सध्या सुपर स्टार आहेत.

चंद्रबाबु नायडू आणि गाला कुटुंबामध्ये देखील चांगले संबंध आहेत. जयदेव गाला यांचं शिक्षण हे ऑक्सफर्ड विद्यापीठात झालं आहे. भारतात आल्यानंतर त्याचं लग्न झालं. सुरूवातीला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर टीडीपीमधून ते आमदार आणि मंत्री बनले.


281 कोटींची माया सापडली

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (Central Board of Direct Taxes (CBDT) ) च्या अधिकाऱ्यांनी मध्यप्रदेशमध्ये घातलेल्या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडलं. कारवाई दरम्यान 281 कोटींची रक्कम आणि बेनामी संपत्ती सापडली होती. धाडीमध्ये राजकारणी, व्यावसायिक, अधिकारी, व्यापारी, सामाजिक कामात सक्रीय असणारे मान्यवर अशा विविध लोकांवर CBDT च्या अधिकाऱ्यांनी छापे घातले होते.


VIDEO: राहुल गांधींचा बायोपिक करणार का सुबोध भावे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2019 11:26 AM IST

ताज्या बातम्या