नाराज टीडीपी अखेर एनडीएमधून बाहेर; वायएसआर काँग्रेस मोदींविरोधात अविश्वास ठराव आणणार

आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळाला नाही म्हणून नाराज असणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) यांनी भारतीय जनता पार्टीसोबत (एनडीए) संबंध तोडले आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 16, 2018 09:49 AM IST

नाराज टीडीपी अखेर एनडीएमधून बाहेर; वायएसआर काँग्रेस मोदींविरोधात अविश्वास ठराव आणणार

16 मार्च : आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळाला नाही म्हणून नाराज असणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) यांनी भारतीय जनता पार्टीसोबत (एनडीए) संबंध तोडले आहेत. अशी माहिती चंद्राबाबू नायडू यांनी खासदारांना दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आज वायएसआर काँग्रेस संसदेत नरेंद्र मोदी सरकारविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणणार आहे, ज्याला टीडीपीही पाठिंबा देणार आहे.

दोन महिन्यांवर कर्नाटक निवडणूका आल्या असताना चंद्राबाबू नायडू यांनी घेतलेला हा निर्णय भाजपसाठी धोक्याचा आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातला पराभव आणि दुसरीकडे शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा निर्णय यातून भाजपचे अच्छे दिन गेले असं म्हणायला हरकत नाही आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2018 09:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close