टीडीपी राजकीय स्वार्थासाठी एनडीएतून बाहेर -राजवर्धन राठोड

टीडीपी राजकीय स्वार्थासाठी एनडीएतून बाहेर -राजवर्धन राठोड

टीडीपी एनडीएतून बाहेर पडली या प्रश्नावर राठोड म्हणाले की, टीडीपी हा राजकीय स्वार्थासाठी एनडीएतून बाहेर पडला. पण आम्हाला देश चालवायचा आहे.

  • Share this:

17 मार्च : चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष राजकीय स्वार्थासाठी एनडीएतून बाहेर पडलाय अशी टीका केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड यांनी केली. तसंच उद्या टीडीपी जर काँग्रेससोबत गेली तरी पुन्हा कधी तरी सोबत येईलच याला राजकीय पोजिशनिंग म्हणतात असंही राठोड म्हणाले.

न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया समिटमध्ये आज केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी परखडं मतं मांडली. जातीयवाद हा भारताची सर्वात मोठी कमजोरी आहे. आपल्याला प्रांतवाद आणि जातीयवादातून बाहेर पडलं पाहिजे असं राठोड म्हणाले.

'कुछ तो लोग कहेंगे उनका काम हैं कहना' असं कडवं म्हणत लोकांना वाटतं की आम्ही काँग्रेस सरकारसारखं काम करावं पण का ?, हा बदल चांगला असून तो परत जाणार नाही असंही राठोड म्हणाले. तसंच आगामी निवडणुकांमध्ये प्रसारमाध्यमांची काळजी वाटते.पण मीडियाने कधी मॅनेज झालं नाही पाहिजे. हल्ली सोशल मीडियावर नकारात्मक गोष्टी लगेच व्हायरल होत आहे, हे धोकादायक आहे अशी चिंताही राजवर्धन राठोड यांनी व्यक्त केली.

टीडीपी एनडीएतून बाहेर पडली या प्रश्नावर राठोड म्हणाले की, टीडीपी हा राजकीय स्वार्थासाठी एनडीएतून बाहेर पडला. पण आम्हाला देश चालवायचा आहे. 2019 पर्यंत या पक्षांना जाणीव होईल की भाजपचं 2019 ची निवडणूक जिंकू शकतो. तेव्हा ते परत आमच्याकडे येतील. आम्हाला सोमवारी अविश्वास ठरावाची चिंता नाही. एनडीएचा साथ सोडून टीडीपी फक्त आपली ताकद दाखवत आहे अशी टीकाही राठोड यांनी केली.

First published: March 17, 2018, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading