नवी दिल्ली, १ नोव्हेंबर : तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडून काँग्रेसबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपी आणि काँग्रेस भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी एकत्र येत असल्याचं राहुल गांधी यांनी आज पत्रकारांशी बोलतान सांगितलं.
चंद्राबाबूंशी आमची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. लोकशाही वाचवण्यासाठी ते आवश्यक आहे, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केलं. TDP या अगोदर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होता.
TDPनेते चंद्राबाबू नायडू यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची आज दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीच्या वेळी भाजपच्या विरोधात एकत्र यायचा निर्णय या तीन पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याचं समजतं. यासंदर्भात चंद्राबाबू नायडू यांनी एक ट्वीटही केलं आहे. देशाच्या भविष्यासाठी आम्ही एकत्र येतोय, असं नायडू म्हणाले.
We decided to meet in Delhi to chalk out a plan to protect the future of the nation: TDP leader & AP CM N Chandrababu Naidu after meeting NCP's Sharad Pawar & NC's Farooq Abdullah pic.twitter.com/xJ9V4i69xB
— ANI (@ANI) November 1, 2018
२०१९च्या लोकसभा निवडणुका जवळ येताहेत तशी राजकीय समीकरणं बदलायला सुरुवात झाली आहे. गेली ५ वर्षं भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं स्थिर सरकार केंद्रात दिलं. पण रालोआमधले सगळे घटक पक्ष खुश नाहीत. अनेकांनी भाजपच्या कारभारावर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
आम्ही भाजपला हरवण्यासाठी एकत्र येतोय. लोकशाही वाचवण्यासाठी ते आवश्यक आहे, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केलं. चंद्राबाबूंशी आमची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला, असंही राहुल गांधी म्हणाले.
Live from the press conference New Delhi https://t.co/dXXuCRaT57
— N Chandrababu Naidu (@ncbn) November 1, 2018
तेलंगणच्या जागांसाठी टीडीपी आणि काँग्रेस यांच्यात समझौताही झाल्याचं समजतं. एकूण ११९ जागांपैकी १४ जागा तेलगू देशमला देण्यास काँग्रेस तयार आहे. ९५ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार आहे, असं समजतं. तेलंगणाच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जागावाटपाची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकांसाठीसुद्धा आणि आगामी आंध्र प्रदेश निवडणुकांसाठीही हे दोन पक्ष एकत्र येऊ शकतात.
VIDEO : ‘अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे’, मुलायम सिंहांच्या छोट्या सुनेचं मत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh, BJP, Chandrababu naidu, Narendra modi, NDA, Rahul gandhi, TDS, Telangana