धक्कादायक! कोरोनामुळे घरून काम करणाऱ्या TCS अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

धक्कादायक! कोरोनामुळे घरून काम करणाऱ्या TCS अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

सहकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : कोरोनामुळे संपूर्ण देश जवळजवळ लॉक डाऊन झाला आहे. त्यामुळे प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना सध्या घरून काम करावे लागत आहे. हेच वर्क फ्रॉम होम आता लोकांच्या जीवाशी आले आहे. TCSमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या घरून काम करत असताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला. 53 वर्षीय अमित जैन ग्लोबल हेड या पदावर TCSमध्ये काम करत होते. काही दिवसांपूर्वी घरून काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सहकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कोरोनामुळे गेले काही दिवस अमित जैन घरून काम करत होते, त्यामुळे ते कामाच्या व्यापात 6 दिवस झोपलेही नव्हते. त्यांना थकवाही जाणवत होता, मात्र तरी ते दिवसरात्र काम करत राहिले. त्यामुळे तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

दरम्यान, अमित जैन यांच्या मृत्युनंतर टाटा कंपनी विरोधात अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. मात्र याचे खंडन करत अमित जैन यांचे भाऊ मुकुल जैन यांनी, "17 मार्च रोजी माझ्या भावाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला त्वरित जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा उपचार करण्यासाठी रुग्णालयात डॉक्टर नव्हते, त्यामुळे त्यांचा उपचार करण्यास उशीर झाला, यात त्यांचा मृत्यू झाला", असे सांगितले.

लॉकडाऊनला गांभीर्यानं घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात केलं ट्वीट

मुख्य म्हणजे अमित जैन यांना कोणताही आजार नव्हता. मुकुल जैन नाही द हिंदूला दिलेल्या माहितीत, " तो खूप काळजी घ्यायचा स्वतःची, त्यामुळे त्याचा हार्ट अटॅक येणे धक्कादायक आहे. टाटा कंपनी आपल्या सर्व अधिकाऱ्यांची खूप काळजी घेतात. त्यामुळे कंपनीमुळे त्यांचा मृत्यू झाला ही बाब चुकीची आहे", असे सांगितले.

दरम्यान, अमित जैन यांचा हृदयविकाराचा झटका तीव्र तणावामुळे झाला आहे का, असे विचारले प्रसिद्ध हार्ट सर्जन देवी प्रसाद शेट्टी यांनी शक्यता नाकारता येत नाही असे सांगितले. तसेच, "सध्याच्या परिस्थितीत सर्व तणावात आहेत. त्यात गेले काही दिवस अमित जैन यांची झोप पूर्ण झाली नव्हती. सतत एका जागेवरून काम करणे हे सगळे प्रकार शरीरासाठी त्रासदायक असतात. त्यामुळे घरून काम करत असाल तर आरोग्याची काळजी घ्यावी", असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.

कोरोनामुळे सध्या सर्व राज्यांमध्ये लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करावे लागत आहे. TCS मधील जवळजवळ 4 लाख कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत.

दुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारी कनिका काही वर्षांपूर्वी घेणार होती स्वत:चा जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2020 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading