लॉकडाऊनमध्ये अडकली गर्भवती महिला, टॅक्सी ड्रायव्हरनं 21 दिवस ठेवलं स्वत:च्या घरी

लॉकडाऊनमध्ये अडकली गर्भवती महिला, टॅक्सी ड्रायव्हरनं 21 दिवस ठेवलं स्वत:च्या घरी

कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर पुन्हा 3 मेपर्यंत वाढवण्यात आला. याकाळात वाहतुकीच्या सर्वच सेवा बंद असल्यानं अनेक लोक बाहेरगावी अडकून पडले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 एप्रिल : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात सुरुवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. तो लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक जण जिथं होते तिथंच अडकले होते. यामध्ये बाहेरगावी गेलेले, कामानिमित्त बाहेर असलेले लोकांना अनेक समस्या समोर होत्या. मात्र यात लोकांनी एकमेकांना मदत केल्याची काही उदाहरणं आहेत. कोरोनाच्या संकटाशी लढताना माणुसकीच्या नात्यानं लोक मदत करत आहेत.

गुरुग्राममध्ये राहणाऱ्या संजय नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरनं एका गर्भवती महिलेला त्याच्या घरी 21 दिवस राहण्यासाठी जागा दिली. लॉकडाऊनमुळे ती महिला अडकून पडली होती. लॉकडाऊन पुन्हा वाढवला तेव्हा संजयनं कर्फ्यू पास तयार करून महिलेला तिच्या घरी जयपूरला सोडलं.

जयपूरमधून 8 महिन्यांची एक गर्भवती महिला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर इथं गेली होती. ती गुरुग्राममध्ये जाऊन अडकली होती. तेव्हा महिला ज्या टॅक्सीमध्ये बसली होत्या त्या टॅक्सी ड्रायव्हरनं 21 दिवस महिलेसह तिच्या मुलीला आसरा दिला.

हे वाचा : पुणे एअरपोर्टवरून झेपावलं पहिलं विदेशी विमान, अडकलेले 125 नागरिक मायदेशी रवाना

लॉकडाऊनच्या आधी ते जयपूरहून परत येत होते तेव्हा एका महिलेला मुलीसोबत उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरला जायचं होतं. पण त्या अडकून पडल्या होत्या. त्यावेळी संजय यांना पहिल्यांदा भीतीही वाटली की, महिलेला पाहून प्रश्नही विचारले जातील पण माणुसकीच्या नात्यानं तिला घरी घेऊन आले. गेल्या 21 दिवसांपासून सुहाना सिंह आणि त्यांची मुलगी घरी राहिल्या. त्यांना जेवण घातलं, रुग्णालयात नेलं.

हे वाचा : अल्पवयीन मुलाने चोरीचे कारण सांगताच न्यायधीशांच्या डोळ्यात आलं पाणी

संजय म्हणाला की,'त्यावेळी कोणताच मार्ग नव्हता. मला वाटलं की एक दिवसाची गोष्ट आहे. पण हा लॉकडाऊन इतका असेल याचा अंदाज नव्हता.' सुहाना सिंगने म्हटलं की, टॅक्सी ड्रायव्हरने आमची खूप मदत केली. जेव्हा पैसे संपले तेव्हा भागातील नगरसेवकाकडे मदत मागितली. नगरसेवकाने मदत केली आणि कर्फ्यू पासही करून दिला. त्यानंतर आम्हाला घरी सोडलं.

हे वाचा : वर्दीतली माणसं! कोरोनाच्या संकटात लोकांसाठी देवदूत ठरतायत पोलीस, पाहा PHOTOS

First published: April 19, 2020, 9:43 AM IST

ताज्या बातम्या