मराठी बातम्या /बातम्या /देश /

राज्यावर तौत्केचं अस्मानी संकट; मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री अमित शाहांसोबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू

राज्यावर तौत्केचं अस्मानी संकट; मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री अमित शाहांसोबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू

Tauktae Cyclone: सध्या अरबी समुद्रात तौत्के चक्रीवादळाचं संकट घोंघावत आहे. या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा, केरळ अशा राज्यांना बसण्याची शक्यता आहे. या आपत्काली परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 मे: सध्या राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. राज्याची सर्व यंत्रणा कोरोना साथीशी लढत असताना राज्यावर आता अस्मानी संकट उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळ आता हळूहळू उग्र रुप धारण करत असून राज्याच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. एकीकडे कोरोना विषाणूचं संकट असताना चक्रीवादळाच्या या नव्या संकटामुळे राज्य दुहेरी कात्रीत सापडलं आहे. चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीशी लढण्यासाठी राज्यानं तयारी केली अजून धोक्याच्या ठिकाणी एनडीआरएफच्या जवानांना तैनात केलं आहे.

त्याचबरोबर मुंबईतील समुद्र किनाऱ्यापासून जवळच्या कोविड सेंटरमधील रुग्णा इतरत्र हलवण्यात येत आहेत. तौत्के चक्रीवादळ केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या दिशेनं पुढं सरकत आहेत. या आपत्कालीन परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी राज्यसरकार आणि केंद्र सरकार यांच्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

हे ही वाचा-Cyclone Tauktae: मुंबईतील 3 कोविड सेंटरमधून 400 रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवले

या बैठकीत "तोत्के" चक्रिवादळनं निर्माण केलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेही उपस्थित होते. या बैठकीत कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

(संपूर्ण बातमी थोड्याच वेळात...)

First published:

Tags: Amit Shah, Uddhav thackeray