एका टॅटूमुळे सापडली तपासाची महत्त्वाची कडी, 5 दिवसांत पोलिसांनी असा शोधला गुन्हेगार
एका टॅटूमुळे सापडली तपासाची महत्त्वाची कडी, 5 दिवसांत पोलिसांनी असा शोधला गुन्हेगार
कांलिदी गोल्डमध्ये राहणारी अंशू लग्नाच्या एक महिन्यापूर्वीपर्यंत आरोपी पती हर्ष शर्मा याच्या कंपनीत काम करीत होती. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं व ऑगस्ट महिन्यात दोघांनी आर्य समाजातील मंदिरात लग्न केलं. तो जावरा कंपाऊंडमधील हर्ष शर्मा याच्या घरात राहत होती.
एका टॅटूमुळे पोलिसांना हत्येचं गूढ उकलण्यासाठी मदत झाली आणि दिवसांपासून तपास सुरू असलेल्या केसचा उलगडा झाला
दिल्ली, 21 ऑक्टोबर : एका टॅटूमुळे पोलिसांना हत्येचं गूढ उकलण्यासाठी मदत झाली आणि दिवसांपासून तपास सुरू असलेल्या केसचा उलगडा झाला आणि आरोपीपर्यंत पोहोचणं जास्त कठीण झालं. नवी दिल्लीत 5 दिवसांपूर्वी अशोक विहार इथे एक मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या हातावर दोन टॅटूच्या सहाय्याने त्याची ओळख पटली. तपास करत असताना पोलिस गुरगाव येथे पोहोचले जिथे ही हत्या घडली. नरेश नावाच्या व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी उत्तर प्रदेशातील सहारनपूरचा रहिवासी आहे. त्याने पोलिसांना सांगितले की मृत संदीप हा त्याचा मित्र होता. नरेशने पीडितेचा आपल्या पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला. 15 ऑक्टोबरला कन्स्ट्रक्शन साइटवर एका कर्मचाऱ्याला दोन पिशव्या सापडल्या. या पिशव्यांमधून खूप दुर्गंध येत होता. त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहाणी केली आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हे वाचा-VIDEO : नंदुरबारनंतर आणखीन एक भीषण अपघात, 150 मीटर दूरपर्यंत आडवी घसरत गेली बस
याचा तपास करत असताना पोलिसांना मृत तरुणाच्या हातावर टॅटू सापडला आणि त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. या मृत व्यक्तीच्या हातावर संदीप आणि ओम असे टॅटू लिहिलेले दिसले आणि पोलिसांनी ओमचा शोध सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 ऑक्टोबर रोजी नरेश आणि संदीप दोघंही ढाब्यावर बसून दारू रिचवत होते. नरेशनं आपल्या मित्रावर धारदार शस्त्रानं घरी येताच वार केले आणि तुकडे करून मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून दिला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी एका टॅटूवरून अखेर या हत्येचा उलगडा केला आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.