Home /News /national /

टाटांनी रोवली होती एअर इंडियाची मूळं, 88 वर्षांनी आता पुन्हा देणार आधार

टाटांनी रोवली होती एअर इंडियाची मूळं, 88 वर्षांनी आता पुन्हा देणार आधार

आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियासाठी 17 मार्चपर्यंत बोली लावण्यात येणार आहे

    मुंबई, 4 फेब्रुवारी : एअर इंडिया या हवाई वाहतूक सेवा देणाऱ्या कंपनीची मूळं जेआरडी टाटा यांनी रोवली होती. आता पुन्हा ही कंपनी टाटांची होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियासाठी 17 मार्चपर्यंत बोली लावण्यात येणार आहे. टाटा ग्रुप आणि सिंगापूर एयरलाईन्स एकत्रितपणे एअर इंडिया खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ते कामाला लागल आहेत. 1932 मध्ये जेआरडी टाटांनी एअर इंडिया या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर 1946 मध्ये याचं नॅशनलायजेशन केलं होतं. पहिल्यांदा यांच नाव टाटा एअरलाइन्स असं होतं. मात्र नॅशनलायजेशननंतर 1948 मध्ये याचं नाव एअर इंडिया करण्यात आलं. आता पुन्हा एअर इंडिया ही कंपनी टाटांकडे येण्याची शक्यता आहे. टाटा ग्रुप हा प्लान यशस्वी बनविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्लानमध्ये एअर एशिया इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस सहभागी आहे. ज्यात एअर इंडियाची सब्सिडरी 100 टक्के इतकी आहे. (यामध्ये टाटाची 51 टक्के भागीदारी आहे) मोदी सरकारने या कंपन्यांमध्ये विकला हिस्सा टाटा ग्रुपने एअर इंडिया एक्सप्रेस खरेदी करण्याच्या मंजुरीसाठी मलेशियाई उद्योगी टोनी फर्नांडिस यांच्याशीदेखील संपर्क केला आहे. यांचे एअर एशियामध्ये 49 टक्के भागीदारी आहे. शेअरधारकांमध्ये झालेल्या चर्चेअंती जर फर्नांडिस तयार नसेल तर टाटा ग्रुप अन्य बजट एअर लाइन्समध्ये 10 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक करू शकणार नाही. एअर एशियाला आतंरराष्ट्रीय उडान करण्यासाठी मंजुरीची प्रतिक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच नव्या करारावर स्वाक्षरी केली जाऊ शकते. एअर एशियाची सुरुवात टाटा ग्रुप आणि फर्नांडिस या दोघांमध्ये 2013 साली झाली होती. यामध्ये टाटाची 51 टक्के भागीदारी आहे. एअर इंडिया एक्सप्रेस 20 भारतीय शहरांमध्ये वाहतूक सेवा देतात. याशिवाय खाडी आणि दक्षिण आशियायी देशातील 13 आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरही ते उपलब्ध आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Airindia, Tata

    पुढील बातम्या