TATA ची कार महागणार! तब्बल 26 हजारांनी होणार वाढ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

TATA ची कार महागणार! तब्बल 26 हजारांनी होणार वाढ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

कंपनीने पुन्हा आपल्या वाहनांच्या किंमतीत 26 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जानेवारी :  भारतामध्ये कार निर्मितीसाठी अग्रेसर असणाऱ्या टाटा मोटर्सनी आता त्यांच्या कारच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सनी त्यांच्या सर्व मोटारींच्या किंमतीत 26 हजार रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा कारची ही नवीन किंमत 22 जानेवारीपासून देशभर लागू होईल. सहा महिन्यात दुसर्यांदा टाटा मोटर्सकडून त्यांच्या कारच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. याआधी सुद्धा ऑगस्ट 2020 मध्ये टाटाने आपले Altroz, Harrier, Nexon, Tiago या कारच्या किमतीत वाढ केली होती. पण यावेळी वाढ करताना मात्र टाटाकडून ग्राहकांसाठी थोडी सूट देण्यात आली आहे.

'या तारखेपर्यंत करा बुकिंग, आणि मिळवा सूट' : सीएनबीसी आवाजच्या एका अहवालानुसार टाटा मोटर्सनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर ठेवली आहे. टाटा मोटर्सनी अजून नक्की त्यांच्या कोणत्या मॉडेलच्या किमतीत वाढ केलेली आहे हे कळालं नसलं तरीदेखील ज्या ग्राहकांनी 21 जानेवारीच्या आधी TATA MOTORS च्या कारचं बुकिंग केलं आहे त्यांना मात्र ती जुन्याचं किमतीत मिळणार आहे. नवीन लागू झालेल्या वाढीव किमतीचा त्यांना कोणताही आर्थिक फटका बसणार नाही.

 

मारुतीने देखील वाढवल्या वाहनांच्या किमती - मारुती सुजुकीने सुद्धा आपल्या काही निवडक मॉडेल्सच्या किमतीत वाढ केली आहे. वाहनांच्या इनपुट कास्टमध्ये वाढ झाल्यामुळे किंमतीही वाढविण्यात आल्याचं मारुती सुजुकीकडून सांगण्यात येत आहे. 18,जानेवारी 2021 पासून या नवीन किमती लागू करण्यात आल्यात. तब्बल 34,000 रुपयांनी ही वाढ करण्यात आली आहे. मारुतीने या आधीच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या वाहनांच्या किंमती वाढविण्याचं स्पष्ट केलं होत आणि आता कंपनीने जानेवारीपासून सुरुवात केली आहे.

हे देखील वाचा -  तुम्हाला माहित आहे का की किती महत्त्वाचे आहेत क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमधील हे डिटेल्स? गडबड झाल्यास त्वरित येईल लक्षात

जर या वर्षी तुम्ही कार खरेदी करायचा विचार करत असाल तर ती लवकरच बुक करून घ्या. कारण आता टाटा आणि मारुतीने त्यांच्या किमतीत वाढ केल्यानंतर महिंद्रा, टोयोटा, रेनॉ, निसान आणि  हुंडई सुद्धा लवकरच त्यांचे नवीन मॉडेल नवीन किमतीसह बाजारात उतरवण्याची शक्यता आहे.

 

 

Published by: Aditya Thube
First published: January 23, 2021, 7:04 PM IST

ताज्या बातम्या