Home /News /national /

एअर इंडियाचा 'महाराजा' पुन्हा टाटांकडे?

एअर इंडियाचा 'महाराजा' पुन्हा टाटांकडे?

सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि १० वर्षे तोट्यात असलेली एअर इंडिया ही राष्ट्रीय विमान कंपनी विकत घेण्यात टाटा उद्योग समूहाने स्वारस्य दाखवलं असल्याचं वृत्त आहे.

22 जून : सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि १० वर्षे तोट्यात असलेली एअर इंडिया ही राष्ट्रीय विमान कंपनी विकत घेण्यात टाटा उद्योग समूहाने स्वारस्य दाखवलं असल्याचं वृत्त आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनेने हे वृत्त देताना म्हटलं की, सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत एअर इंडियाचे ५१ टक्के भागभांडवल खरेदी करून ही विमान कंपनी ताब्यात घेण्याच्या इराद्याने टाटा समूहाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सरकारी पातळीवर प्राथमिक स्वरूपाची बोलणीही केली आहेत. महाराजा पुन्हा टाटांकडे ? - टाटा एअरलाइन्स जेआरडी टाटांनी १९३२मध्ये सुरू केला. - स्वातंत्र्यानंतर हीच कंपनी सरकार आणि खासगी भागीदारीत एअर इंडिया इंटरनॅशनल झाली. - सरकारनं विमान वाहतूक उद्योगाचं राष्ट्रीयीकरण केल्याने, एअर इंडिया सरकारी झाल्याने टाटा त्यातून बाहेर पडले. - गेल्या १० वर्षांत एअर इंडियाची प्रवासीसंख्या २० टक्क्यांनी कमी असूनही त्यांचा वाटा १४ टक्क्यांचा आहे. - टाटांसाठी जमेची बाजू - एअर इंडिया खरेच टाटांकडे आल्यास ही कंपनी सुमारे ७० वर्षांनी मूळ मालकाकडे परत येईल - सर्वात पहिलं विमान मुंबई ते कराची जेआरडींनी स्वत: चालवलं होतं.
First published:

Tags: Air india, Tata, एअर इंडिया, टाटा

पुढील बातम्या