Home /News /national /

Tata Group सॅटेलाइट ब्रॉडबँडमध्ये देणार एलॉन मस्क अन् जेफ बेझोसला टक्कर, जाणून घ्या प्लॅन आणि फायदे

Tata Group सॅटेलाइट ब्रॉडबँडमध्ये देणार एलॉन मस्क अन् जेफ बेझोसला टक्कर, जाणून घ्या प्लॅन आणि फायदे

टाटा ग्रुप हा नेल्को कंपनीची (Nelco Company) लाइटस्पीड ब्रॉडबँड सेवा (Broadband Service) 2024 पर्यंत भारतात आणण्यासाठी टेलिसॅटसोबत विचारविनिमय करत आहे.

नवी दिल्ली 12 ऑगस्ट : सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा (Satellite Broadband Service) ही आगामी काळात सेवा देणाऱ्यांसाठी स्पर्धात्मक क्षेत्र ठरणार आहे. या क्षेत्रात नव्याने प्रवेश केलेल्या कॅनडामधील कंपनी टेलिसॅटसोबत (Telesat) टाटा समूह (Tata Group) भागीदारी करण्याची शक्यता आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार, टाटा ग्रुप हा नेल्को कंपनीची (Nelco Company) लाइटस्पीड ब्रॉडबँड सेवा (Broadband Service) 2024 पर्यंत भारतात आणण्यासाठी टेलिसॅटसोबत विचारविनिमय करत आहे. या दोन कंपन्यांमधील भागीदारीची चर्चा अंतिम टप्प्यात असून, या सेवेसाठी लवकरच चाचण्या सुरु होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. टेलिसॅटकडे आहे सॅटेलाइट ब्रॉडबँड प्लॅन टेलिसॅटकडे (Telesat) एक मोठी सॅटेलाइट ब्रॉडबँड योजना असून, त्याकरिता 298 लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट अंतराळात स्थापित करण्यासाठी सुमारे 37,200 कोटी रुपये गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पारंपरिक सॅटेलाइटच्या तुलनेत 298 लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट हे चांगलं नेटवर्क आणि दमदार स्पीडसाठी (Speed) अधिक प्रभावी ठरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ज्या भागात वायर्ड इंटरनेट सेवा पोहोचणं अशक्य आहे अशा दुर्गम भागात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा ही अत्यंत उपयुक्त ठरणार असून त्या भागासाठी ती जीवनवाहिनी ठरेल. देशातील राज्यं ही भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असून, या भागात टेलिसॅटची लाइटस्पीड (Lite speed) आणि अॅलन मस्क (Elon Musk) यांच्या स्टारलिंकसारख्या सेवा या कनेक्टिव्हिटीची प्रमुख साधनं ठरतील अशी अपेक्षा आहे. BSNL ग्राहकांना झटका! या 7 प्लॅनमध्ये कंपनीने कमी केले बेनिफिट्स, वाचा सविस्तर मस्क यांच्या स्टार लिंकला टक्कर मस्क यांच्या स्टार लिंकने (Star Link) आपल्या सेवेकरिता यापूर्वीच आगाऊ बुकिंग सुरू केलं आहे. 2022 पर्यंत 150 एमबीपीएसच्या सरासरी बॅंडविड्थसह ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. भारती एअरटेल (Bharti Airtel) देखील वनवेब सॅटेलाइट इंटरनेट सेवा 2022 पासून सुरु करण्याच्या तयारीत आहे. जेफ बेझोस यांची अॅमेझॉन (Amazon) ही कंपनीदेखील आपल्या सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेसह या क्षेत्रात प्रवेश करु शकते. भारत हा देश जगातील सर्वाधिक इंटरनेट युजर्सपैकी एक असून, यामुळे सीमांत भागात अशा सेवांना मागणी वाढू शकते. सोनिया गांधींनी बोलावली विरोधकांची बैठक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित इंटरनेट क्षेत्रात जिओचे योगदान मोठे इंटरनेट सेवांच्या वाढीसाठी भारत हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. लोकसंख्येचा विचार करता एका महत्वपूर्ण वर्गाला अजूनही स्थिर आणि हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीची गरज आहे. देशात रिलायन्स जिओमुळे (Reliance Jio) इंटरनेट युजर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे मोबाईल इंटरनेटच्या दरात लक्षणीय घट झाली आहे आणि कनेक्टिव्हिटी क्षेत्राचाही विस्तार झाला आहे. जिओने इतर टेलिकॉम ऑपरेटर्सला कनेक्टिव्हिटीबाबत विचार करण्यास भाग पाडलं आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबतीत भारत हा जगातील सर्वात किफायशीर देशांपैकी एक देश ठरला आहे.
First published:

Tags: High speed internet, Tata group

पुढील बातम्या