संसदेची नवी इमारत आता टाटा बांधणार; Tata ने जिंकलं 862 कोटींचं कंत्राट

संसदेची नवी इमारत आता टाटा बांधणार; Tata ने जिंकलं 862 कोटींचं कंत्राट

लोकशाहीचं मंदिर म्हणून ओळखली जाणारी संसदेची ऐतिहासिक इमारत 92 वर्षांची झाल्याने आता नवीन इमारत बांधायच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर :  Tata Projects Limited ने भारतीय संसदेच्या (New parliament building) नव्या इमारतीचं कंत्राट मिळवलं आहे. देशाची शान असलेली भव्य इमारत आता जुनी झाली आहे. लोकशाहीचं मंदिर म्हणून ओळखली जाणारी संसदेची ऐतिहासिक इमारत 92 वर्षांची झाल्याने आता नवीन इमारत बांधायच्या हालचाली काही वर्षांपूर्वी सुरू झाल्या होत्या. मोदी सरकारच्या काळात या प्लॅनला गती मिळाली आणि यासाठी निविदा मागवण्यात आल्या. त्यात टाटा समूहाने बाजी मारत हे बिड जिंकलं आहे.

संसदेच्या या नवीन इमारतीचे काम लवकरच सुरु होणार असून यासाठी 861.90 कोटी रुपयांचे हे कंत्राट टाटा कंपनीला मिळाले आहे. भारताची संसद इमारत खूप वर्षांची झाली असून मागील काही काळापासून ही इमारत नवीन बांधण्याविषयी सरकारचा विचार सुरू होता. 92 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत भारताची शान असून दिल्लीमधील महत्त्वाची वास्तू आहे. मात्र काळाच्या ओघात आता  ही इमारत जुनी झाली असून याठिकाणी लवकरच नवीन इमारत बांधली जाणार आहे. इमारतीची सध्याची स्थिती  लक्षात घेऊन नवीन आणि सुसज्ज संसद भवन बांधण्याचे मोदी सरकारने मनावर घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

मागील वर्षी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील नवीन सुसज्ज इमारत उभी करण्याची सूचना केली होती.  केंद्र सरकारने हे लक्षात घेऊन देखणं, अत्याधुनिक नवीन संसद भवन उभारण्याचं  मनावर घेतलं. सध्या असलेलं संसद भवन खूप भव्यदिव्य. मात्र ही दगडी इमारत आता थोडी जीर्ण झाली आहे. दिल्लीत मोठा पाऊस झाला की ही इमारत गळते. जुन्या पद्धतीच्या अंतर्गत रचनेमुळे अनेक भागांमध्ये आणि संसदेच्या पॅसेजमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करता येत नाही. इंटरनेटच्या जमान्यात अनेक भागांमध्ये साधी मोबाईलची रेंज मिळणंही दुरापास्त होतं. वीज व्यवस्थेसाठी बांधकामात फेरफार करणं शक्य नसल्यामुळे अपुऱ्या व्यवस्थेपोटी कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येतात.

संसदेच्या या नवीन इमारतीचं काम या पावसाळी अधिवेशनानंतर तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने निविदा मागवल्या होत्या. त्यानंतर मागील महिन्यात सरकारने यासाठी तीन कंपन्या शॉर्टलिस्ट केल्या होत्या. यामध्ये Larsen & Toubro, Tata Projects आणि  Shapoorji Pallonji & Company या तीन कंपन्या शॉर्टलिस्ट केल्या होत्या. एल अँड टी आणि शापुरजी पालनजीला मागे टाकत टाटाने हे बिड जिंकलं.

दरम्यान, नवीन इमारतीसाठी सरकारला या संसद भवनाच्या आसपास जागा शोधावी लागणार आहे. ब्रिटिशांनी ही इमारत बांधताना आसपास मोठ्या प्रमाणात जागा सोडली होती. मात्र कालांतराने या जागेवर मोठ्या प्रमाणावर इमारती बांधल्याने गेल्याने आता या नवीन इमारतीसाठी सरकारला जागा शोधावी लागणार आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 16, 2020, 7:12 PM IST
Tags: parliament

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading