Elec-widget

विनयभंग प्रकरणी तरूण तेजपाल यांच्यावर आरोप निश्चित

विनयभंग प्रकरणी तरूण तेजपाल यांच्यावर आरोप निश्चित

तहलका नियतकालिकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांच्यावर गोवा कोर्टाने विनयभंग प्रकरणी आरोप निश्चित केलेत. तेजपाल यांच्यावर ऑफीसमधील सहकारी तरुणीवर जबरजस्ती केल्याचा आरोप आहे.

  • Share this:

पणजी, 28 सप्टेंबर : तहलका नियतकालिकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांच्यावर गोवा कोर्टाने विनयभंग प्रकरणी आरोप निश्चित केलेत. तेजपाल यांच्यावर ऑफीसमधील सहकारी तरुणीवर जबरजस्ती केल्याचा आरोप आहे. गोव्यातील 'थिंक फेस्ट' दरम्यान, एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी आपल्यावर जबरजस्ती करून, विनयभंगही केल्याची तक्रार संबंधीत तरुणीने केली होती. त्यावरूनच तेजपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. आता ते जामिनावर आहेत.

तेजपाल यांच्याविरोधात 376 (क) या कलमांसोबतच 354ए, 341, 343 आणि 354(क) कलमांतर्गंत आरोप निश्चित करण्यात आलेत. याविरोधात तरूण तेजपाल यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती पण हायकोर्टाने तुर्तास या खटल्यात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिलाय. आपल्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसताना केवळ राजकीय दबाव वापरून आपल्याला या केसमध्ये अडकवलं जात असल्याचा तेजपाल यांचा आरोप आहे. आता या खटल्याची पुढची सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...