जास्त वेळा वीज गेली तर आता मिळणार पैसे, मोदी सरकारची ही आहे योजना

जास्त वेळा वीज गेली तर आता मिळणार पैसे, मोदी सरकारची ही आहे योजना

हे धोरण लागू करण्यापूर्वी सर्व ठिकाणी स्मार्ट मीटर लावणं बंधनकारक आहे. ज्या घरांमध्ये अशा प्रकारचं मीटर नाही तिथे या योजनेचा फायदा मिळणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 12 जून : प्रचंड उकाडा आणि वारंवार घरातली वीज जाणं हे तसं आपल्याला नवं नाही. तर पावसाळ्यात पावसामुळे अनेकदा बत्ती गुल होते. त्यामुळे घरात वीज असून फायदा काय असा प्रश्न ग्रामीण भागतल्या लोकांना पडलेला असतो. पण आता काळजीचं कारण नाही. जास्त वेळा घरातली वीज गेली तर सरकार आता पेनल्टी देणार आहे. यासाठी केंद्र सरकार नवं टॅरिफ धोरण तयार करत आहे. सर्व राज्यांनी हे धोरण मान्य केलं तर त्याचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे.

केंद्रीय उर्जा मंत्रालय हे धोरण तयार करत असून सर्व राज्यांची मतं मागविण्यात आली आहेत. या धोरणानुसार प्रमाणपेक्षा जास्त वीज गेली तर मंडळाला ग्राहकाला पॅनल्टी द्यावी लागेल. वीज बिलामधून ती पॅनल्टी कमी केली जाणार आहे. पण हे धोरण लागू करण्यापूर्वी सर्व ठिकाणी स्मार्ट मीटर लावणं बंधनकारक आहे. ज्या घरांमध्ये अशा प्रकारचं मीटर नाही तिथे या योजनेचा फायदा मिळणार नाही.

सर्व राज्यांशी या धोरणाबाबत केंद्राने चर्चेही पहिली फेरी पूर्ण केलीय. 1 एप्रिलपासूनच हे धोरण लागू केलं जाणार होतं. मात्र काही राज्यांनी आक्षेप घेतल्याने ही योजना पुढे ढकलण्यात आलीय.

हे धोरण लागू झालं तर वीज मंडळ आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढणार आहे. तर स्मार्ट मीटरमुळे वीज चोरीलाही आळा बसेल अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.

First published: June 12, 2019, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading