मराठी बातम्या /बातम्या /देश /

हा आहे पृथ्वीवरील सर्वांत शक्तिशाली जीव; उकळत्या पाण्यात टाका की अवकाशात फेका...तो जिवंत राहतो!

हा आहे पृथ्वीवरील सर्वांत शक्तिशाली जीव; उकळत्या पाण्यात टाका की अवकाशात फेका...तो जिवंत राहतो!

शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षे याच्या या अमरत्वाचं गूढ शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, पण अद्याप तरी त्यात यश आलेलं नाही.

शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षे याच्या या अमरत्वाचं गूढ शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, पण अद्याप तरी त्यात यश आलेलं नाही.

शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षे याच्या या अमरत्वाचं गूढ शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, पण अद्याप तरी त्यात यश आलेलं नाही.

नवी दिल्ली, 26 जानेवारी : निसर्गाची अनेक रहस्य आजही मानवाला उलगडलेली नाहीत. असाच एक रहस्यमय जीव आहे टार्डिग्रेड (Tardigrad). मोठा विलक्षण असा हा जीव आहे. याला उकळत्या पाण्यात टाका, वजनदार वस्तूखाली दाबून टाका किंवा त्याला दूर अंतरिक्षात फेकून द्या, तो जिवंत राहतो. शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षे याच्या या अमरत्वाचं गूढ शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, पण अद्याप तरी त्यात यश आलेलं नाही.

टार्डिग्रेड्सचा शोध भारताने लावला -

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी टार्डिग्रेडसचा शोध लावला आहे. टार्डिग्रेड रेडिएशन आणि उष्णतादेखील सहन करू शकतात हे निरीक्षणदेखील भारतीय संशोधकांनी नोंदवलं होतं. ऑनलाइन सायन्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं होतं.

500 दशलक्ष वर्षे जुना जीवाश्म -

ज्वालामुखी असो की बर्फ सर्व परिस्थितीत जिवंत राहणारा हा टार्डिग्रेड पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन ज्ञात जीवांपैकी एक असावा, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला असून, हा पृथ्वीवरील सर्वांत शक्तिशाली जीव असल्याचं त्याचं म्हणणं आहे. याचा सर्वांत जुना जीवाश्म 500 दशलक्ष वर्षे जुना असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

समुद्रातला सूक्ष्म जीव -

आठ पायांचा टार्डिग्रेड एक सूक्ष्म जीव आहे. मायक्रोस्कोपमधूनच त्याला व्यवस्थित पाहता येऊ शकते. प्रौढावस्थेत तो 1.5 मिलीमीटर लांब असतो; तर यामधील सर्वात छोटा जीव फक्त 0.1 दशांश मिलीमीटर लांबीचा असतो. या जीवाला वॉटर बिअर (Water Bear) किंवा टार्डिग्रेड्स (Tardigrade) असे म्हटले जाते. 1773 मध्ये त्याच्या आकारमानामुळे त्याला लिटिल वॉटर बिअर असं म्हटलं जायचं. तीन वर्षांनी त्याचं नाव बदलून टार्डिग्रेड करण्यात आलं.

कोणत्याही परिस्थितीत जगतो -

खोल समुद्रापासून ते पर्वतांच्या शिखरापर्यंत एवढेच नाही, तर ज्वालामुखीच्या जवळदेखील याचं अस्तित्व आढळतं.

टार्डिग्रेड 300 डिग्रीपेक्षा जास्त तापमानातही राहू शकत असल्यानं आगीच्या ठिकाणीही याचे अस्तित्व दिसून येतं. नदी किंवा समुद्रामध्येदेखील मोठ्याप्रमाणात आढळतो.

रेडिएशन सहन करण्याची क्षमता -

वैज्ञानिकांना सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे रेडिएशनचा प्रतिकार करण्याची क्षमता टार्डिग्रेडकडं आहे. माणूस आणि जीवजंतू क्ष किरणांचा विशिष्ट मर्यादेपलीकडील मारा सहन करु शकत नाहीत. टार्डिग्रेड्स मात्र मानवापेक्षा एक हजारपट अधिक रेडिएशन सहन करु शकत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जगातील सर्वात शक्तीशाली जीव -

अंतराळात हवा नसल्यामुळे आणि सूर्यकिरणांच्या अभावामुळे कोणी जिवंत राहू शकत नाही; मात्र त्याठिकाणी देखील टार्डिग्रेड्स जिवंत राहत असल्याचं सिद्ध झालं आहे. 2007मध्ये वैज्ञानिकांनी हजारो टार्डिग्रेड्सला एकत्र करुन त्याला ‘Foton-M3’ नावाच्या सॅटेलाइटमध्ये टाकून अंतराळामध्ये पाठवले होते. ज्यावेळी हे सॅटेलाइट पुन्हा जमिनीवर आले त्यावेळी त्यातील सर्व टार्डिग्रेड्स जिवंत तर होतेच; पण मादी टार्डिग्रेड्सने अंडीसुद्धा दिली होती.

त्यामुळं कोणत्याही हवामानात, तापमानात जिवंत राहणाऱ्या जगातील सर्वात शक्तीशाली टार्डिग्रेड्सचा आता मेडिकल सायन्समध्येही वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच्या मदतीनं रुग्णालयात रेडिएशनचा प्रभाव कमी करणं किंवा रेडिएशनच्या मदतीनं नवीन शोध घेणं शक्य होईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

First published:

Tags: Scientist