Home /News /national /

एकाच कुटुंबातील चार महिलांवर केले शारीरिक अत्याचार, ढोंगी बाबाचे कारनामे उघड झाल्यावर खळबळ

एकाच कुटुंबातील चार महिलांवर केले शारीरिक अत्याचार, ढोंगी बाबाचे कारनामे उघड झाल्यावर खळबळ

नागपुरातील एका बलात्कार पीडित तरुणीने युट्यूब व्हिडीओ पाहून स्वत: चा गर्भपात केला आहे. (File Photo)

नागपुरातील एका बलात्कार पीडित तरुणीने युट्यूब व्हिडीओ पाहून स्वत: चा गर्भपात केला आहे. (File Photo)

हा कथित तपस्वी बाबा स्वत: ला देव म्हणवायचा आणि त्याच्याकडे जाणाऱ्या महिलांना प्रसाद म्हणून भांग द्यायचा आणि मग बलात्कार करायचा.

    जयपूर, 25 मे : एका ढोंगी बाबाला अनेक महिलांवर बलात्कार (Rape case) केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या आश्रमातून अटक केली आहे. या ढोंगी बाबानं एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यावर या बाबाचा भांडाफोड झाला. कुटुंबीयांनी भंकरोटा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला. मंगळवारी पोलिसांनी पीडित महिलांच्या जबाबानंतर आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे कथित तपस्वी बाबा उर्फ ​​योगेंद्र मेहता याला अटक केली. एका पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार हा तपस्वी बाबा स्वत: ला देव म्हणवायचा आणि त्याच्याकडे जाणाऱ्या महिलांना प्रसाद म्हणून भांग द्यायचा, ते खाल्ल्यानंतर अर्धवट बेशुद्ध पडलेल्या महिलांवर तो मग बलात्कार करायचा. या घटनेचं वृत्त दैनिक जागरणने दिलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा ढोंगी बाबा योगेंद्र मेहता फरार झाला होता. परंतु, पोलिसांच्या तावडीतून सुटला नाही,  पोलिसांनी त्याला काही दिवसातच अटक केली, असे पोलीस अधिकारी मुकेश चौधरी यांनी सांगितलं. एका पीडित महिलेनं सांगितले की तिचें लग्न वर्ष 1998 मध्ये जयपूरच्या बिंदायका येथे झालं होतं. तिच्या सासरी कुलदेवता एक तपस्वी बाबा होते. मात्र त्यांच निधन झालं होतं. त्यांच्या आश्रमात गेल्या 15 वर्षांपासून महिलेच कुटुंब जात होतं. तपस्वी बाबांच्या मृत्यूनंतर या ढोंगी मेहतानं त्यांच्या गादीवर कब्जा केला होता. त्याचं मुख्य आश्रम मुकुंदपुरा येथे आणि इतर दोन सीकर आणि दिल्ली रोडवर आहेत. तो स्वत:ला तपस्वी बाबा आणि आपण देव असल्याचे सांगायचा. पीडित महिलेनं सांगितलं की, ती आपल्या पतीसमवेत आश्रमात जात असे. अनेकदा ती तेथे सेवा-पूजेसाठी तीन-चार दिवस राहत असे. काही काळ चांगला गेला, पण एके दिवशी मेहतानं त्यांना आश्रमाच्या छतावरील खोलीत बोलावून घेतलं आणि प्रसाद आहे असं म्हणत एक गोळी खायला दिली. मेहता पीडितेला म्हणाला की, तू आता देवाचं ध्यान कर आणि मला सर्व तुझं काही सोपव. त्या गोळीमुळं नशेत गेलेल्या महिलेवर मग त्यानं बलात्कार केला. पतीच्या सांगण्यावरून जेव्हा ती पुन्हा आश्रमात गेली, तेव्हा मेहतानं तिच्यावर पुन्हा बलात्कार केला आणि कोणालाही याबाबत न सांगण्याची धमकी दिली अन्यथा तुमचा विनाश करण्याची भीती घातली. हे वाचा - DOG ही सांगू शकतो तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; अवघ्या काही सेकंदातच करू शकतो निदान काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेचा पती आपल्या 20 वर्षीय मुलीला घेऊन आश्रमात निघाला होता. त्यावेळी तिनं मुलीला आश्रमात नेण्यास मनाई केली, याबाबत पतीनं तिला कारण विचारल्यानंतर त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर घरातील सर्वांनी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की या महिलेच्या एका मोठ्या आणि दोन छोट्या जावांवरही अशाचप्रकारे बाबानं अत्याचार केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Jaipur, Rape, Rape case, Rape news

    पुढील बातम्या