नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : दिवाळीतील नव्या जाहिरातीमुळे 'तनिष्क' (Tanishq) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महिन्याभरापूर्वी या कंपनीने आंतरधर्मिय विवाहासंदर्भात एक जाहिरात केली होती. त्यावर जोरदार विरोध केला जात होता. तनिष्कने केलेली जाहिरात लव्ह-जिहादचं समर्थन करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त (Diwali 2020) केलेल्या जाहिरातीवर टीका केली जात आहे.
आता कंपनीने 'एकत्वम' नावाने एक नवीन कलेक्शन लॉन्च केलं आहे. याच्या जाहिरातीत त्यांनी फटाके बंदीचं समर्थन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका केली जात आहे. या जाहिरातीत नीना गुप्ता, सयानी गुप्ता, निमरत कौर, अलाया एफ दिसत आहे आणि ती दिवाळीविषयी चर्चा करीत आहेत. या ट्रोलिंगनंतर तनिष्कने आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट डिलीट केलं आहे. मात्र व्हिडीओ एका ट्विटमध्ये पाहू शकता.
ट्रोलिंगचं काय आहे कारण?
'तनिष्क' च्या नवीन जाहिरातीत महिला आपल्या दिवाळीच्या प्लान्सविषयी बोलत आहेत. दरम्यान त्या फटाके बंदीविषयी बोलतात आणि समजावतात की कसा हा सण कुटुंबाच्यासोबत राहण्यात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासंबंधात आहे. याबाबत अनेक युजर्सनी कंपनीवर धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण केल्याचा आरोप लावला आहे.
यापूर्वीच्या जाहिरातीप्रमाणे या जाहिरातीसाठीदेखील तनिष्कला पाठिंबा मिळत आहे. काही युजर्स म्हणाले की, या जाहिरातीत ब्रँड केवळ एकतेविषयी बोलत आहे. फटाके बंदी पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त करते.
#EkatvamByTanishq, showcases the coming together of over 1000 Karigars, effortlessly. Shop now and avail exciting offers*!
*T&C Apply
Book an appointment: https://t.co/QxR2YJNk11
More: https://t.co/zmVZ29Z0Gk@sayanigupta | @NimratOfficial | @AlayaF___ | @Neenagupta001 pic.twitter.com/VbOTZG2BNW
— Tanishq (@TanishqJewelry) October 31, 2020
हे ही वाचा-VIDEO: दिवाळीत करा ‘आशेची रोषणाई’ रितेश जेनेलियाने दिला संदेश
गोंधळानंतर यापूर्वीची जाहिरात घेतली होती मागे
तनिष्कला गेल्या महिन्यात खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या जाहिरातीत आंतरधर्मिय विवाहावरुन लव्ह-जिहादच्या मुद्दा करीत त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने जाहिरात मागे घेतली होती. त्यावेळी कंपनीने सांगितलं होतं की, ते कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा पाऊल उचलत आहे.