S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

तंदूर हत्यांकांड प्रकरण, सुशील शर्माची अखेर सुटका होणार

माफीचा कालावधी पकडून सुशील शर्माने जेलमध्ये 29 वर्ष काढली आहेत.

Updated On: Dec 21, 2018 03:53 PM IST

तंदूर हत्यांकांड प्रकरण, सुशील शर्माची अखेर सुटका होणार

नवी दिल्ली,21 डिसेंबर : तेवीस वर्षांपूर्वी देशभर गाजलेल्या तंदूर हत्याकांड प्रकरणातला मुख्य आरोप सुशील शर्मा याची सुटका करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी शर्माला आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती. ती शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावरही त्याला सोडण्यात आलं नव्हतं. त्या विरुद्ध शर्माने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हा आदेश दिलाय.


घटनेच्या वेळी काँग्रेसचा युवा नेता असलेल्या सुशील शर्माने त्याची पत्नी नैना सहानीची हत्या केली होती नंतर तीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते तंदूरच्या भट्टीत जाळले होते. ते प्रकरण देशभर गाजलं होतं. माफीचा कालावधी पकडून त्याने 29 वर्ष जेलमध्ये काढली आहेत.या प्रकरणी अनेक वर्ष खटला चालण्यानंतर शर्माला फाशीची शिक्षाही खालच्या न्यायालयाने दिली होती. या शिक्षेविरोधात तो सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. नंतर फाशीच्या शिक्षेचं रूपांतर आजन्म कारावासात झालं होतं.


 


 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close