चालकाविनाच ट्रकचा 'घुमर डान्स', सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

चालकाविनाच ट्रकचा 'घुमर डान्स', सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

एक ट्रक चालकाविनाच महामार्गावार उलट्या दिशेनं गोल फिरत होता.

  • Share this:

20 डिसेंबर : तामिळनाडूमधल्या एका विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर व्हायरल होतोय. एक ट्रक चालकाविनाच महामार्गावार उलट्या दिशेनं गोल-गोल फिरत होता.

घडलेली हकीकत अशी की,  तामिळनाडूच्या महामार्गावर ट्रकला छोटासा अपघात झाला. यात समोरील चाक निकामे झाले. मात्र, त्याचवेळी ट्रक चालकाकडून चुकून रिव्हर्स गिअऱ टाकला गेला. त्यामुळे ट्रकने मागे येण्यास सुरुवात झाली. तेव्हाच चालकाचा ताबा सुटला आणि तो बाहेर फेकला गेला. आता ट्रकमध्ये चालकच नसल्यामुळे ट्रक सुसाट गिरट्या घालत होता. चालक आणि किनर ट्रकवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकात प्रयत्न करताय. किनर भला मोठा दगड घेऊन चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही ट्रक काही नाव थांबत नाही.  इतर लोकंही या ट्रकवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना या ट्रकवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य झालं होतं.

चालक नसतानाही बराचवेळ ट्रक उलट्या दिशेनं कसा काय फिरत होता, याचं लोकांना राहून राहून कुतूहल वाटत होतं. म्हणून अनेकांनी या विचित्र अपघाताचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. काहींना तर हा ट्रकचा घुमर डान्स आहे असं म्हणून शेअर सोशल मीडियावर शेअर केला.  अल्पवधीतच या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.

First published: December 20, 2017, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading